AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Accident News : धडाम आवाज अन् रात्रीच्या भयाण अंधारात फक्त त्यांच्या किंचाळ्या घुमल्या…. नाशिकमध्ये कार थेट विहिरीत कोसळली, बायका, मुलांसह 9 ठार

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे हृदयद्रावक अपघात घडला आहे. भरधाव वेगातील चारचाकी गाडी विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा, ज्यात लहान मुलांचाही समावेश होता, दुर्दैवी अंत झाला. एका खासगी कार्यक्रमातून परत येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले असून इंदोरे गावावर शोककळा पसरली आहे.

Nashik Accident  News : धडाम आवाज अन् रात्रीच्या भयाण अंधारात फक्त त्यांच्या किंचाळ्या घुमल्या…. नाशिकमध्ये कार थेट विहिरीत कोसळली, बायका, मुलांसह 9 ठार
नाशिकमध्ये भीषण अपघात
| Updated on: Apr 04, 2026 | 7:48 AM
Share

नाशिक येथील दिंडोरीमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणारी चारचाकी गाडी विहीरीत कोसळून भीषण अपघात झाला.ईरटीका गाडी आणि त्यातील 9 जण विहीरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 9 जणांना काळाने घाला घातल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील सर्व लोकं हे दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी होते. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या कारमध्ये 3 ते 4 लहान मुलांचाही समावेश असल्याचा अंदाज आहे. हा दुर्दैवी अपघात नेमका कशामुळे झाला ते अद्याप समजू शकलेलं नाही. अपघातीच माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतसी, अपघातस्थळी मोठा जमाव जमला होता.

क्षणात झालं होत्याचं नव्हतं…

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमधील प्रवासी हे एक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आनंदात आटोपून घरी परत येत होते. मात्र एक क्षणात होत्याचं नव्हतं झालं, काळाने या कुटुंबावर झडप घातली आणि 9 जणांचा बळी गेला. ही कार अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारील विहिरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातानंतर काल रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिक व प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू होतं. 9 मृत नागरिकांपैकी 5 जणांची ओळख समोर आली आहे. – सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे श्रावणी अनिल दरगोडे अशी मृतांची नावं असल्याचं समजते. या अपघातातील सर्व जण हे दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी असल्याचेही समजते.

कार्यक्रम आटपून हसतखेळत घरी येत होते, पण…

मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी शहरात MH15-JS-1053 हा क्रमांक असलेली कार शिवाजी नगर येथे राजू राजे यांच्या विहिरीत कोसळली. अपघातानंतर स्थानिक नागरिक व प्रशासनाने धाव घेत बचाव कार्य सुरु केलं. अथक प्रयत्नांती अपघातातील कार क्रेनच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आली असता, त्यामध्ये कारमध्ये एकूण नऊ जण असल्याची माहिती मिळाली असून सर्वांचा मृत्यू झाला आहे.

सुनील दरगोडे व त्यांच्या कुटुंबातील लोकं, तसेच इतर नातेवाईक हे एका कार्यक्रमावरून परत येत होते. सर्वजण आनंदात गप्पा मारत, हसतखेलत हा प्रवास करत होते, मात्र तोच प्रवास त्यांचा अखेरचा ठरला. पण वाटेतच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला असावा आणि भरधाव वेगाने पळणरी कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या, पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत कोसळली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. रात्री खूप अंधार असल्याने व विहीर पाण्याने भरलेली असल्यामुळे कार व अडकलेले लोक बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. एकाच कुटुंबातील नागरिकांचा मृत्यू झाल्याने इंदोरे गावावर शोककळा पसरल आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?