AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amaravati Murder Case: उदयपूरच्या कन्हेयाचा जीव वाचला असता; अमरावतीच्या अमेश कोल्हेंच्या भावाचा दावा

अमरावती पोलिसांनी चार ते पाच दिवसापूर्वी प्रकरण उघडकीस आणलं असतं तर राज्यस्थान मधील उदयपूरच्या कन्हैयाचा जीव वाचला असता असं महेश म्हणााले. माझ्या भावाच्या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला हे आमचं भाग्य आणि दुर्दैव दोन्ही आहे. यापुढे कोणाची हत्या होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी असं अवाहन महेश यांनी केले आहे. 

Amaravati Murder Case: उदयपूरच्या कन्हेयाचा जीव वाचला असता; अमरावतीच्या अमेश कोल्हेंच्या भावाचा दावा
vanita kamble
vanita kamble | Updated on: Jul 02, 2022 | 7:49 PM
Share

अमरावती: अमरावतीच्या उमेश कोल्हे(Umesh Kolhe) हत्याप्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. उदयपूरमध्ये (Udaipur) कन्हैयालालची(Kanhaiyalal ) हत्या होण्याच्या आठवडाभर आधीच उमेश कोल्हीची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर आता मृतक उमेश कोल्हे यांचा भाऊ महेश कोल्हे मिडीयासमोर आले असून त्यांनी खळबळजनक दावे केला आहे.

वादग्रस्त नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने उमेश कोल्हे यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. मृतक उमेश कोल्हे यांचा भाऊ महेश कोल्हे प्रथमच प्रसार माध्यमा समोर आले आहेत.

अमरावती पोलिसांनी चार ते पाच दिवसापूर्वी प्रकरण उघडकीस आणलं असतं तर राज्यस्थान मधील उदयपूरच्या कन्हैयाचा जीव वाचला असता असं महेश म्हणााले. माझ्या भावाच्या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला हे आमचं भाग्य आणि दुर्दैव दोन्ही आहे. यापुढे कोणाची हत्या होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी असं अवाहन महेश यांनी केले आहे.

अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या देखील नुपूर शर्मा प्रकरणामुळेच

54 वर्षीय उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे अमरावतीत एकच खळबळ उडाली. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज खरा ठरला असून नुपूर शर्मा प्रकरणामुळेच कोलेहे यांची हत्या झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

कोल्हे यांचं स्वत:चं मेडिकल स्टोर आहे. 21 जून 2022 ला कोल्हे रात्री उशीरा आपल्या मेडिकलमधून घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. घरी परतत असताना या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच गाठलं आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ते ठार झाले.

या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अजूनही बेपत्ता आहे. उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत कोल्हे याने अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुदस्सीर अहमद आणि 25 वर्षीय शाहरुख पठाण या दोघांना 23 जून रोजी अटक करण्यात आली. अब्दुल तौफिक (24), शोएब खान (22) आणि अतिब रशीद (22) या तिघांना 25 जून रोजी अटक करण्यात आली होती. तर मुख्य आरोपी शमीम अहमद फिरोज अहमद हा अद्याप फरार आहे. कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट व्हॉट्सअॅपवर शेअर आणि फॉरवर्ड केली होती. हा मेसेज त्याने मुस्लिम लोक असलेल्या ग्रुपवरही केला. त्यामुळे या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याने ही हत्या झाल्याचा संशय आहे.

अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचे कनेक्शन थेट नुपूर शर्मा प्रकरणाशी जोडण्यात येत आहे. नुपूर शर्मा प्रकरणीच उदयपूरमध्ये कन्हैयालाल नावाच्या टेलरची हत्या झाली होती. उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या होण्याच्या आठवडाभर आधीच उमेश कोल्हेची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. हत्येनंतर काही वेळातच दोन तरुणांनी एक व्हिडिओ जारी केला आणि धारदार शस्त्रे दाखवून हत्येची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पोलिसांनी यांना अटक केली.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार