हृदयद्रावक ! आधी वडील गेले, वर्षभरातच आई आणि मुलानेही आयुष्य संपवले.. त्या घरात नेमकं काय घडलं ?

काही जण विपरीत परिस्थितीपुढे हतबल होऊन हार मानतात. काही वेळा यातूनच टोकाचे पाऊल उचलले जाते आणि आयुष्याला वेगळंच वळण मिळतं, काही अघटित घडतं.

हृदयद्रावक ! आधी वडील गेले, वर्षभरातच आई आणि मुलानेही आयुष्य संपवले.. त्या घरात नेमकं काय घडलं ?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 29, 2023 | 10:45 AM

अमरावती | 29 नोव्हेंबर 2023 : आयुष्य खूप कठीण आहे. सगळ्यांना सगळं सहज, सोप्या रितीने यश मिळत नाही. बऱ्याचा जमांना खस्ता खाऊन, परिश्रम करूनच जगावं लागतं. काही जण संकटाच्या काळातही डगमगून न जाता, अथक मेहनत करून लढा देऊन उभे राहतात. पण काही जण विपरीत परिस्थितीपुढे हतबल होऊन हार मानतात. काही वेळा यातूनच टोकाचे पाऊल उचलले जाते आणि आयुष्याला वेगळंच वळण मिळतं, काही अघटित घडतं.

अशीच एक अघटित घटना अमरावतीमध्ये घडली. तेथे एका महिलेने गरिब परिस्थितीमुळे टोकाचं पाऊल उचललं. आर्थिक ओढाताणीमुळे महिलेने तिच्या मुलासह स्वत:चंही आयुष्य संपवल्याची अतिशय हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. योगिता वाघाडे (वय 34) असे मृत महिलेचे नाव असून तिच्या 12 वर्षांच्या मुलाचाही दुर्दैवी अंत झाला.

वर्षभरापूर्वी झाले पतीचे निधन

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील हमालपुरा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. तेथे योगिता वाघाडे या त्यांच्या १२ वर्षांच्या मुलासह रहात होत्या. योगिता यांच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. त्यानंतर त्या मेहनत करून, कसंबसं घर चालवण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांची आर्थिक ओढाताण खूपच वाढली होती. गरिबीची परिस्थिती असल्यामुळे, मुलाचं संगोपन नीट करता येत नसल्याने त्या हताश झाल्या होत्या.

अखेर त्यांनी या सर्व परिस्थितीला कंटाळून एक नको तो निर्णय घेतला आणि टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी १२ वर्षांच्या मुलाला विष पाजलं आणि स्वतःही विष पिऊन आयुष्य संपवलं. या दुर्दैवी आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोकाकुल वातावरण आहे.