बदलापुरातील ‘या’ कारणातून माजी नगरसेवकावर हल्ला, पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या आरोपीच्या मुसक्या

या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू बागुल याने 2013 साली शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी म्हात्रे यांचे समर्थक असलेल्या अविनाश मोरे यांनी बदलापूर बंदची हाक दिली होती.

बदलापुरातील या कारणातून माजी नगरसेवकावर हल्ला, पोलिसांनी अशा आवळल्या आरोपीच्या मुसक्या
बदलापुरातील 'या' कारणातून माजी नगरसेवकावर हल्ला
Image Credit source: TV9
| Updated on: Sep 21, 2022 | 10:53 PM

बदलापूर / निनाद करमरकर (प्रतिनिधी) : बदलापूरमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश उर्फ आऊ मोरे यांच्यावर मंगळवारी रात्री हल्ला (Attack) करण्यात आला होता. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. विशाल आचार्य असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

रात्री घरी असताना मोरे यांच्यावर हल्ला

बदलापूरमधील माजी नगरसेवक अविनाश उर्फ आऊ मोरे हे मंगळवारी रात्री शिरगाव आपटेवाडी परिसरातून इनोव्हा कारने त्यांच्या घरी जात होते. यावेळी महेंद्र उर्फ पप्पू बागुल आणि विशाल आचार्य या दोघांनी टोयोटा कोरोला गाडी मोरे यांच्या गाडीला आडवी घातली.

मोरे यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

यानंतर पप्पू बागुल याने मोरे यांच्याजवळ जात त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. तसंच पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी तपासाची चक्रं वेगानं फिरवत विशाल आचार्य याला त्याच्या गाडीसह ताब्यात घेतलं आहे.

पूर्ववैमनस्यातून मोरेंवर हल्ला

या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू बागुल याने 2013 साली शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी म्हात्रे यांचे समर्थक असलेल्या अविनाश मोरे यांनी बदलापूर बंदची हाक दिली होती. त्याच रागातून मोरे यांच्यावर 9 वर्षांनी हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळते.

मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार

पप्पू बागुल हा सराईत गुंड असून त्याच्यावर आतापर्यंत आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. बागुल अद्याप फरारआहे. त्याच्या शोधासाठी आता पोलिसांनी दोन पथकं रवाना केली आहेत.