AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्याच देशातला हादरवणारा प्रकार… ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीमचा पर्दाफाश; अख्ख राज्यच हादरलं

एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर एकच खळबळ निर्माण झालीये. पोलिसांनी नुकताच या प्रकरणातील आरोपींना सापळा रचत अटक केलीये. या प्रकरणात सतत धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. देशामधील एक हैराण करणारा प्रकार उघडकीस आलाय.

आपल्याच देशातला हादरवणारा प्रकार... ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीमचा पर्दाफाश; अख्ख राज्यच हादरलं
| Updated on: Jan 06, 2024 | 8:37 PM
Share

मुंबई : नुकताच एक अत्यंत धक्कादायक प्रकार पुढे आलाय. या घटनेनंतर लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. या प्रकारानंतर संपूर्ण देश हादरला. पोलिस देखील चांगलेच चक्रावले आहेत. ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीमचा पर्दाफाश करण्यात आलाय. यामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आलीये. 200 पेक्षाही अधिक लोक यामध्ये अडकले असून बदनामीमुळे कोणीही पुढे येण्यास तयार नाहीये. नुकताच पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलंय. या आरोपींकडून अनेक मोबाईल देखील जप्त करण्यात आली. अत्यंत हैराण करणारा प्रकार उघडकीस झालाय.

धक्कादायक म्हणजे या गुन्हातील आरोपी हे सर्व शिक्षित आहेत. राजस्थान येथील उदयपूरमधील 5 तरुणांनी एकदम झटपट श्रीमंत व्हायचे होते आणि त्यांनी लोकांची फसवणुक करणारा प्लॅन तयार केला. या पाच जणांनी शेकडो लोकांची फसवणुक केली. त्यांच्याकडून बक्कळ पैसे काढले. जवळपास 200 पेक्षाही अधिक लोक यांच्या फसवणुकीचे शिकार झाले.

या तरुणांनी इंन्स्टाग्राम आणि हॅलो अॅपवर ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीम सुरू केली. हे तरुण सोशल मीडियावर जाहिराती करून तरुणांना मुलींसोबत मैत्री करण्याच्या बहाण्याने अडकवत असत. अश्लील फोटो तरुणांनी पाठवत असतं. यानंतर ते मेंबरशिपसाठी पैशांची मागणी करत. जसेही यांच्या खात्यामध्ये पैसे येत तसेच ते समोरच्या व्यक्तीचा नंबर ब्लाॅग करत.

या लोकांनी या दरम्यान कोट्यवधीची कमाई केली. बदनामीच्या भितीने लोक यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हते. यानंतर या धक्कादायक प्रकाराची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी सापळा रचून थेट आरोपींना पकडले आहे. पोलिस हे ग्राहक बनून त्यांच्या संपर्कात आले आणि सापळा रचून त्यांना पकडले. पोलिसांनी यांच्याकडून अनेक फोटो आणि लॅपटाॅप जप्त केले.

विशेष म्हणजे यांच्या फोनमध्ये अनेक अश्लील फोटो दिसले जे ग्राहकांना पाठवण्यात आले. या प्रकाराचा मास्टरमाइंड सत्यम याने सांगितले की, आम्ही लोकांकडून एकदम कमी पैसे घेत असल्याने लोक आमच्या विरोधात तक्रार करत नव्हते. या आरोपींनी सोशल मीडिवावर शिवानी नावाचे फेक अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवरून तरूणी असल्याचे भासवून तरूणांसोबत चॅट केली जायची.

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.