
आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी त्याच्या बायकोची हत्या केली. त्यानंतर त्यानेही जीव संपवला. त्यामुळे या परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याने बायकोवर निर्दयपणे चाकू हल्ला केला. त्यात ती मरण पावली. आधी त्याने प्लान तयार केला. त्यानंतर हा हल्ला केला. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाच्या मूळाशी जाऊन तपास करत आहेत.
तिरुपती ग्रामीणच्या मंगलम येथील बोम्मला क्वार्टर येथे ही घटना घडली. 35 वर्षाच्या उषाचं नेल्लोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाधर येथे राहणाऱ्या लोकेश्वरसोबत झालं होतं. त्यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली होती. दोघांना दोन मुलेही आहेत. लग्नानंतर सर्वकाही सुरळीत सुरू होतं. पण काही काळाने दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाले होते.
कारण आलं समोर
उषा ही करकंबाडी येथील अमरा राजा फॅक्ट्रीत काम करत होती. तर लोकेश्वर बीएसएनलमध्ये कॉन्ट्रॅक्ट टेक्निशियन होता. उषा आणि लोकेश्वरमध्ये वारंवार वाद व्हायचे. लोकेश्वर पत्नी उषावर संशय घ्यायचा. हेच त्यांच्या वादाचं मुख्य कारण होतं. गेल्या महिन्याच्या 30 तारखेला दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. भांडणानंतर लोकेश्वर दोन्ही मुलांना घेऊन त्याच्या आईवडिलांकडे गेला होता.
चाकूने हल्ला
दोघेही वेगळं राहू लागल्याने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर लोकेश्वरने उषाच्या हत्येचा प्लान तयार केला. उषाचा ऑपिसला जाण्या येण्याचा टाइम त्याला माहीत होता. 19 जुलै रोजी उषा पहाटे 5 वाजता ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघाली. ती कंपनीची बस पकड होती. इतक्यात लोकेश्वर पाठीमागून आला आणि त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. उषावर सपासप वार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.
स्वत:ही संपवलं
पोलिसांच्या मते, लोकेश्वरने हत्येची पूर्ण योजना आखली होती. त्याने आधी उषाचा येण्याची वाट पाहिली. उषा घरातून निघाली तेव्हा तो तिचा पाठलाग करत बसपर्यंत आला. त्यानंतर त्याने तिच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर लोकेश्वर थेट घरी गेला आणि त्याने गळफास लावून स्वत:लाही संपवलं. पत्नीला मारल्यानंतर त्यानेही जगाचा निरोप घेतला. आईवडिलांचं छत्र हरपल्याने मुलांचे रडून रडून हाल होत आहेत. तिरुचनूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची चौकशी केली जात आहे. तसेच दोन्ही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी तिरुपती रुईया रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.