अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेची धडक कारवाई, 90 किलो गांज्यासह 17 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना गाडीची डिक्की, बोनेट, दरवाजा आणि सीटच्या खाली लपवून ठेवलेला एकूण 54 बंडल असा एकूण 90 किलो वजनाचा 9 लाख रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ आढळला.

अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेची धडक कारवाई, 90 किलो गांज्यासह 17 लाखाचा मुद्देमाल हस्तगत
संपत्तीच्या हव्यासातून भावाने भावाला संपवले
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jan 06, 2023 | 10:46 PM

ठाणे : अंबरनाथ परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 90 किलो गांजा हस्तगत केला आहे. याप्रकरणी अंबरनाथमधील हिललाईन पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 90 किलो गांजा, इनोव्हा कार, मोबाईल फोन असा एकूण 17 लाख 36 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. रवी मुन्नीलाल जैस्वाल, हसीन कय्युम खान आणि मोहम्मद शदाफ रियाझ अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना गाडीची डिक्की, बोनेट, दरवाजा आणि सीटच्या खाली लपवून ठेवलेला एकूण 54 बंडल असा एकूण 90 किलो वजनाचा 9 लाख रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ आढळला.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला

अंबरनाथ येथील भालपाडा गाव, धामटान बस स्टॉप जवळ 5 जानेवारी रोजी काही जण 100 ते 120 किलो वजनी गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने भालपाडा गाव येथील धामटान बस स्टॉपजवळ एक विशेष पथक तैनात करून सापळा रचला. यावेळी इन्होव्हा कारमध्ये काही संशयास्पद इसम दिसून आले.

यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी गाडी अडवून झडती घेतली. यावेळी गाडीत जवळपास 90 किलो वजनी गांजा मिळून आला. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु केला आहे.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

आरोपींनी हा गांजा कुठून आणला? या गांज्याची ते कुठे विक्री करणार होते? आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.