Dawood | डी गँगशी संबंधित परवेझ जुबेरला अटक, टेरर फंडिंग प्रकरणात एटीएसची मोठी कारवाई

| Updated on: Aug 04, 2022 | 12:29 PM

दाऊद इब्राहिम आणि अनिस इब्राहिमच्या संपर्कात ही व्यक्ती असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Dawood | डी गँगशी संबंधित परवेझ जुबेरला अटक, टेरर फंडिंग प्रकरणात एटीएसची मोठी कारवाई
अटक (प्रातिनिधिक छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबईः दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) गँगशी संबंधित एका व्यक्तीला एटीएसच्या पथकाने अटक केली आहे. परवेझ जुबेर (Parwej Zuber) नामक व्यक्तीला पथकानं नुकतंच ताब्यात घेतलं आहे. टेरर फंडिंगमध्ये (Terror Funding) तो सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने (Anti Terrorism squad) यूएपीए (UAPA) कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आणि मोस्ट वाँटेड अंडर वर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिम याा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात परवेझ असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. अनिस इब्राहिम याच्यासोबतच पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांशी संबंधित व्यक्तीच्याही संपर्कात तो होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

वेगवेगळी रुपं घेत पोलिसांना गुंगारा

या प्रकरणी हाती आलेल्या माहितीनुसार, परवेज झुबेर हा दहशतवाद संबंधित कारवायांसाठी निधी पुरवण्याच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.  मागील काही दिवसांपासून पोलिस याच्या संपर्कात होते. मात्र परवेझ जुबेर पोलिसांच्या हाती लागत नव्हता. वेगवेगळी रुपं घेऊन तो अनेक ठिकाणी तो वास्तव्य करत होता. तसेच दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता. आता मोठा सापळा रचून अखेर एटीएसच्या पथकाने परवेझला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. एटीएस आता या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

गोविंद पानसरे हत्या प्रकरण आता एटीएसकडे

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने काल एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. 2015 मध्ये सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांची हत्या झाली होती. या हत्येचा तपास सीआयडीमार्फत सुरु होता. मात्र आता तो महाराष्ट्र एटीएसवर सोपवण्यात यावा, असा निर्णय दिला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयासमोर या प्रकरणाचा तपास एटीएसला दिल्यास आपली काहीही हरकत नसल्याचे सांगितले.

अनीस इब्राहिम कोण?

अंडरर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनीस इब्राहिम याचाही दहशतावदाच्या कारवाया पूर्ण करण्यात मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. एटीएसने अटक केलेला परवेझ हा अनीस इब्राहिमच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. मागील वर्षी पाकिस्तानात तयार करण्यात आलेल्या दहशतवादी मोड्यूलची निर्मिती अनिस इब्राहिमने केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने हा तपास केला होता. दाऊद इब्राहिमच्या सर्व भावांमध्ये अनीस इब्राहिम सर्वात क्रूर समजला जातो.