Dombivali Crime : वाढदिवसाच्या ऑर्डरचे पैसे मागितले म्हणून हल्ला, तरुण गंभीर जखमी

कल्याण-डोंबिवलीतील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होण्याचे नावच घेताना दिसत नाही. आज पुन्हा डोंबिवलीत धक्कादायक घटना समोर आली आहे.

Dombivali Crime : वाढदिवसाच्या ऑर्डरचे पैसे मागितले म्हणून हल्ला, तरुण गंभीर जखमी
अधिक व्याजाचे आमिष दाखवत फसवणूक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 25, 2023 | 3:53 PM

डोंबिवली / 25 जुलै 2023 : कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारी कमी होण्याचे नावच घेताना दिसत नाही. क्षुल्लक कारणातून हल्ला करणे, हत्या करणे या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. वाढदिवसाच्या ऑर्डरचे पैसे मागितले एकावर चॉपरने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात कलम 326 504 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेश पेडणेकर असे आरोपीचे नाव आहे. पेडणेकर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याची परिसरात दहशत असल्याचे कळते. तर आवेश भोईर असे जखमी तरुणाचे नाव आहे. डोंबिवली पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

काय आहे प्रकरण?

आरोपी पेडणेकर याच्या मुलाचा वाढदिवस होता. यासाठी त्याने आवेश भोईर याला साऊंड सिस्टिमची ऑर्डर दिली होती. मात्र ऑर्डरचे पैसे न मिळाल्याने भोईर हा पैसे घेण्यासाठी पेडणेकरच्या घरी गेला. यावेळी आरोपीने भोईर याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भोईर याने शिवीगाळ करुन नका, माझे राहिलेले पैसे परत करा असे सांगताच आरोपीने खिशातील चॉपर काढून भोईरवर वार केले.

यावेळी तिथे लोकांची गर्दी जमली होती. मात्र आरोपीच्या दहशतीमुळे सर्वजण पळून गेले. या हल्ल्यात भोईर याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. भोईर याने डोंबिवली पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंद केली. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.