VIDEO | Aurangabad Robbery | पेट्रोल पंपावरील कर्मचारी गाफील, अल्पवयीन मुलाने 1 लाख 33 हजार लांबवले, औरंगाबादेतील घटना

| Updated on: Nov 17, 2021 | 8:47 AM

औरंगाबाद (Aurangabad) शहरात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाने पेट्रोल पंपावरील 1 लाख 33 हजाराची रक्कम चोरी (Robbery) केल्याची घटना समोर आली आहे. हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

VIDEO | Aurangabad Robbery | पेट्रोल पंपावरील कर्मचारी गाफील, अल्पवयीन मुलाने 1 लाख 33 हजार लांबवले, औरंगाबादेतील घटना
Aurangabad Robbery
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाने पेट्रोल पंपावरील 1 लाख 33 हजाराची रक्कम चोरी (Robbery) केल्याची घटना समोर आली आहे. हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं?

औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातल्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी गाफील असताना हा 12 वर्षीय अल्पवयीन मुलगा पेट्रोल पंपात घुसला. त्यानंतर त्याने कपाटात ठेवलेली सगळी रक्कम शर्टाच्या आत घालून शिताफीने पोबारा केला. मात्र, हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेत तपासाची चक्रे फिरवली आणि या 12 वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून जवळपास 43 हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. मुलगा अल्पवयीन असल्यामुळे कायदेशीर नियम पाळून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

औरंगाबादेत हायवेवर लूटमार करणाऱ्या तीन दरोडेखोरांना बेड्या

हायवेवर वाहने अडवून लुठणाऱ्या तीन दरोडेखोरांना (Robbery on hoghway) औरंगाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रवींद्र जाधव, राहुल चव्हाण आणि सचिन ऊर्फ बाबा चव्हाण अशी या आरोपींची नावे आहे. ही एकूण पाच दरोडेखोरांची (Robbers Arrested) टोळी होती. यापैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून यातील दोघे मात्र फरार आहेत.

पैसे अन् मालासह ट्रक पळवला होता

नवीन बीड बायपास रोडवरील देवळाई उड्डाणपुलाखाली 13 नोव्हेंबर रोजी रात्री पांडुरंग गायकवाड हे ट्रकमधून ट्रान्सपोर्टचा माल घेऊन जात होते. तेव्हा दरोडेखोरांनी त्यांना अडवून मारहाण केली. तसेच पैसे आणि मालासह ट्रक पळवून नेला. संभाजी साखर कारखाना, चितेगावजवळ ट्रक सोडून दरोडेखोर पसार झाले. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरु असताना पोलीस हवालदार बाबासाहेब नवले यांना राहुल जयसिंग चव्हाण, रवींद्र मानसिंग जाधव, सचिन ऊर्फ बाबा अंबादास चव्हाण व इतर दोन साथीदार अशा पाच जणांनी हा ट्रक लुटल्याचे कळले. स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथके तयार करत रवींद्र जाधव यालाही पकडले. त्याने चौकशीनंतर गुन्ह्याची कबुली दिली. तसेच राहुल चव्हाण आणि सचिन ऊर्फ बाबा चव्हाणदेखील सापडले. त्यांच्याकडून 8 लाख 88 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संबंधित बातम्या :

चाइल्ड पोर्नोग्राफी : देशातील 14 राज्यांत सीबीआयचे छापे; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

मुलीने प्रेमविवाह केला म्हणून संतापलेल्या बापाचे क्रूर कृत्य, आधी बलात्कार मग हत्या