मुलीने प्रेमविवाह केला म्हणून संतापलेल्या बापाचे क्रूर कृत्य, आधी बलात्कार मग हत्या

याप्रकरणी कुटुंबियांची चौकशी केली असता पोलिसांना वडिलांच्या जबाबावरुन संशय आला. त्यानंतर महिलेच्या वडिलांची कसून चौकशी केली असता वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली.

मुलीने प्रेमविवाह केला म्हणून संतापलेल्या बापाचे क्रूर कृत्य, आधी बलात्कार मग हत्या
मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Nov 16, 2021 | 7:18 PM

भोपाळ : प्रेमविवाह केला म्हणून जन्मदात्या बापाने पोटच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची नात्याला काळिमा फायणारी घटना मध्य प्रदेशातील समसगड येथे घडली आहे. भोपाळमधील समसगड येथील जंगलात पोलिसांना एक महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह आढळला होता. हत्या करण्यापूर्वी महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करीत असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महिलेने प्रेमविवाह केल्यामुळे बापाचा संताप अनावर

मयत महिलेने कुटुंबियांच्या मर्जी विरोधात पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. यामुळे महिलेचे कुटुंबिय संतप्त झाले होते. दोन दिवसांपूर्वी महिलेचा आणि तिच्या मुलाचा मृतदेह समसगडच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासाअंती सदर महिला सिहोर जिल्ह्यातील बिस्किसगंज येथील असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी महिलेबाबत चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

नेमकं काय घडलं?

याप्रकरणी कुटुंबियांची चौकशी केली असता पोलिसांना वडिलांच्या जबाबावरुन संशय आला. त्यानंतर महिलेच्या वडिलांची कसून चौकशी केली असता वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. मुलीने पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यामुळे गावातील लोक सतत कुटुंबाला टोमणे मारत होते. विवाहानंतर महिला कधीच माहेरी आली नव्हती. त्यानंतर थेट या दिवाळीमध्ये ती आपल्या मोठ्या बहिणीसोबत घरी आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी महिलेच्या आठ महिन्याच्या मुलाचा आजाराने मृत्यू झाला. याबाबत आरोपीच्या मोठ्या मुलीने आपल्या वडिलांना कळविले.

आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल

नातवाच्या मृत्यूची माहिती मिळताच आरोपी आपल्या मुलासह रातीबिड येथे गेला. तिथे गेल्यावर मयत बालकाचा मृतदेह पुरण्यासाठी तो मयत महिलेला समसगडच्या जंगलात घेऊन गेला. तिथे पोहोचल्यावर आरोपी बाप आणि मयत महिलेमध्ये प्रेमविवाहावरुन वाद झाला. याच वादातून आरोपीने मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बापावर कलम 302 आणि 376 नुसार गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. (Daughter raped and murdered by father for having love affair in madhya pradesh)

इतर बातम्या

चाइल्ड पोर्नोग्राफी : देशातील 14 राज्यांत सीबीआयचे छापे; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

रात्री हायवे वर लूटमार करणाऱ्या तीन दरोडेखोरांना बेड्या,13 लाखांचा मुद्देमाल जप्त, औरंगाबाद गुन्हे शाखेची कारवाई

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें