व्हॉट्सअपवर अनोळखी लग्नाचं कार्ड आलं तर सावध व्हा… या व्यक्तीबाबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं? तो थेट भिकारीच…

Cyber Crime : लग्नाचं कार्ड ठरेल भिकारी होण्याचं कारण... सर्वांनी काळजी नक्की घ्या... नाही तर, या व्यक्तीबाबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं... जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे ते...

व्हॉट्सअपवर अनोळखी लग्नाचं कार्ड आलं तर सावध व्हा... या व्यक्तीबाबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं? तो थेट भिकारीच...
Cyber Crime
Updated on: Nov 28, 2025 | 12:53 PM

Cyber Crime : आता लग्न सराई सुरु झाली आहे. पूर्वी प्रत्येक जण नातेवाईकांच्या घरी जाऊन लग्न पत्रिका देऊन आमंत्रित करायचे. पण आता सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे सर्वकाही एका क्लिकवर सोपं झालं आहे. पण एक क्लिक करणं जेवढं सोपे वाटत आहे, तितकंच भयानक देखील आहे. आता लग्न सराईत एक नवीन सायबर धोका निर्माण झाला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी आता डिजिटल लग्नाच्या निमंत्रण पत्रिकांना फसवणुकीचे साधन बनवलं आहे.

व्हॉट्सऍपवर पाठवलेल्या लग्नाच्या कार्डच्या लिंकवर क्लिक करताच, मोबाईल हॅक होतो आणि काही मिनिटांतच खात्यांमधून हजारो रुपये गायब होत आहेत. या डॉक्टरला व्हॉट्सअपवर लग्नाचं निमंत्र आलं. त्याने ते कार्ड ओपन करताच त्याचे बँक अकाऊंट हॅक झालं आणि सायबर चोरांनी त्याच्या खात्यातले सर्वच पैसे काढून घेतले. त्यामुळे या डॉक्टरचा काही क्षणातच रावाचा रंक झाला आहे. त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोणतीही लिंक क्लिक करण्यापूर्वी काळजी नक्की घ्या…

बिजनोर शहराचे एएसपी डॉ. कृष्णा गोपाल यांनी सांगितल्यानुसार, कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेली कोणतीही लिंक, फाइल किंवा लग्नाचं आमंत्रण उघडल्याने नुकसान होऊ शकतं. त्यांनी एपीके फाइल्स डाउनलोड करू नका, ओटीपी शेअर करू नका आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास ताबडतोब सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधावा असा सल्ला दिला.

होणारी सायबर फसवणूक टाळण्यासाठी, बिजनोर पोलिस एआयच्या मदतीने सतत असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत आहेत, जेणेकरून लोकांना सायबर फसवणुकीबद्दल जागरूक करता येईल. सायबर तज्ज्ञांच्या मते, फसवणूक करणाऱ्या या पत्रिका सामान्य लिंक्स म्हणून पाठवत नाहीत, तर ते एपीके फाइल्सच्या स्वरूपात पाठवत आहेत.

ज्यामुळे कोणी कार्ड टाऊनलोड केल्यानंतर, त्या व्यक्तीच्या फोनमध्ये व्हायरस सक्रिय होतो. त्यानंतर मोबाईल पूर्णपणे आरोपींच्या नियंत्रणात येतो… त्यांना बँक खाती, UPI ऍप्स, पासवर्ड आणि मोबाईल डेटामध्ये एन्ट्री करता येते. त्यानंतर संपर्कात असलेल्या सर्वांना कार्डची लिंक पाठवली जाते… ज्यामुळे ही साखळी मोठी होती.