Bhandara : पेट्रोलपंपावर दमदाटी मारहाण करुण भरलं पेट्रोल, पोलिसांनी घेतलं 9 जणांना ताब्यात

भंडारा शहरातील हायवस्थित बालाजी पेट्रोल पंप येथे घटनेच्या दिवशी 7 जुलैला ला 8 ते 10 तरुणांनी पेट्रोलपंपमध्ये येऊन 50 रूपयाचे पेट्रोल भरले. पेट्रोलचे पैसे न देता पेट्रोल पंप कर्मचारी हरिराम शर्मा यांच्यासोबत वाद घातला.

Bhandara : पेट्रोलपंपावर दमदाटी मारहाण करुण भरलं पेट्रोल, पोलिसांनी घेतलं 9 जणांना ताब्यात
पेट्रोलपंपावर दमदाटी मारहाण करुण भरलं पेट्रोल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 10, 2022 | 8:53 AM

भंडारा – भंडारा (Bhandara) शहरातील हायवे वरील बालाजी पेट्रोलपंप (Balaji Petrol Pump) येथे दरोडा घालणाऱ्या टोळीस अखेर भंडारा पोलिसांनी (Police) जेरबंद केले. या प्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अंकित हड़पे वय 24 वर्ष,आतिश सोनटक्के वय 24 वर्ष,सागर डोंगगरे वय 25 वर्ष,हिमांशु डोंगरे वय 19 वर्ष, दुर्गेश सोयाम वय 19 वर्ष, सॅमुअल बड़वाईक वय 23 वर्ष व 3 विधिसंघर्ष बालक इत्यादी जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून अनेक हत्यारे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. त्याचबरोबर पोलिस त्यांची कसून चौकशी करणार असल्याची देखील माहिती दिली आहे.

कर्मचाऱ्याला मारहाण केली

भंडारा शहरातील हायवस्थित बालाजी पेट्रोल पंप येथे घटनेच्या दिवशी 7 जुलैला ला 8 ते 10 तरुणांनी पेट्रोलपंपमध्ये येऊन 50 रूपयाचे पेट्रोल भरले. पेट्रोलचे पैसे न देता पेट्रोल पंप कर्मचारी हरिराम शर्मा यांच्यासोबत वाद घातला. तसेच त्यावेळी त्यांना मारहाण देखील केली. चाकूचा धाक दाखवून तरूणांनी त्यांच्याकडे असलेले दोन हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी भंडारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा शहरातल्या पोलिसांनी तांत्रिक बाबीचा आधार घेत या प्रकरणातील 9 जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिस कसून चौकशी करीत आहेत

हे कुणाच्या सांगण्यावरुन केलं आहे का ? किंवा असं का केलं याबाबत पोलिस ताब्यात घेतलेल्या तरुणांची चौकशी करीत आहे. तसेच यांनी या आगोदर असं तरुणांनी केलं आहे का ? त्यांच्यावरती यापुर्वी असे कोणते गुन्हे दाखल आहेत का ? याची पोलिस कसून चौकशी करणार आहेत.