Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार निवडणूक आयोगाला विनंती

Eknath Shinde : मागे येथे पंढरपुरात आलो होतो. घाटाच्या पूजेला मी आलो होतो. विश्वशांती, बंधुता सांगणारी आषाढी पूजा करण्याचा मला भाग्य लाभले.

Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार निवडणूक आयोगाला विनंती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार निवडणूक आयोगाला विनंतीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 8:35 AM

पंढरपूर: राज्यातील सत्तेची दोरी हातात येताच शिंदे-फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पावसामुळे सर्वच गोष्टींवर मर्यादा आली आहे. अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. पूर परिस्थिती झाली आहे. पूरपरिस्थिती (flood) नियंत्रणात आणण्यासाठी सर्व यंत्रणा राबवाव्या लागत आहेत. अधिकारी आणि पोलीस काम करत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात निवडणुका घेणं सोयीचं होणार नाही, असं निवडणूक आयोगाला (election commission) सांगणार आहोत. निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती आयोगाला करणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज विठ्ठलाची पूजा पार पडली. यावेळी ते बोलत होते. शिंदे, त्यांची पत्नी, आईवडील, मुलगा, सून आणि नातवाने अशा शिंदे कुटुंबातील चार पिढ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसी आरक्षणाची 12 तारीख आहे. अटॉर्नी जनरल तुषार मेहतांना भेटलो. ओबीसी प्रश्नी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्याची विनंती केली, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यामुळे आता 12 तारखेला काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

इस्कॉन मंदिरांचं भूमिपूजन

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी इस्कॉन प्रतिष्ठानकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. 15 एकर जागेत भव्यदिव्य असे मंदिर उभे राहील. 1965 पासून इस्कॉनची जगभरात मंदिरे आहेत. गोशाळा संशोधन, संवर्धन, बालसंस्कार, अन्नछत्र याचे हजारो जण लाभ घेतात. इस्कॉन मंदिराचे माध्यमातून अध्यात्मिक, सामाजिक काम होत आहेत. केवळ मंदिरे बांधून थांबत नाही तर सामाजिक कामात ही अग्रेसर आहे, असं त्यांनी सांगितलं.

मी राजा नसून सेवक

मागे येथे पंढरपुरात आलो होतो. घाटाच्या पूजेला मी आलो होतो. विश्वशांती, बंधुता सांगणारी आषाढी पूजा करण्याचा मला भाग्य लाभले. ते केवळ आपल्या जनतेमुळेच. मी राज्याचा राजा नसून सेवक आहे. गोरगरिब वंचिताना न्याय देण्याचे काम सरकार करेल. राज्याला सुजलाम सुफलाम करण्याच्या विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण प्रयत्न करणार आहोत. पंतप्रधान, राष्ट्रपतींना भेटल्यावर ते म्हणाले, विकासात राज्याने झेप घ्यावी. केंद्र सरकार पाठीशी राहील असा विश्वास दिला. प्रत्येकाला आपलं वाटावं असं सरकार यापुढील काळात सर्वाना दिसेल, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.