Mohit Sonkar Video : दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करणे पडले महागात; भाजप नेत्याला पत्नीने चांगलेच चोपले

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील (Kanpur) भाजपा (BJP) नेते मोहित सोनकर (Mohit Sonkar) यांना एका भाजप महिला नेत्यासोबत रोमान्स करणे चांगलेच महागात पडले. त्यांच्या पत्नीने त्यांना चपलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हयरल झाला आहे.

Mohit Sonkar Video : दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करणे पडले महागात; भाजप नेत्याला पत्नीने चांगलेच चोपले
Image Credit source: Social
| Updated on: Aug 21, 2022 | 12:45 PM

कानपूर  : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील (Kanpur) भाजपा (BJP) नेते मोहित सोनकर (Mohit Sonkar) यांना एका भाजप महिला नेत्यासोबत रोमान्स करणे चांगलेच महागात पडले. मोहित सोनकर हे भाजपाच्या एका महिला नेत्यासोबत बंददाराआड रोमान्स करत होते. तेव्हा अचानक त्यांची पत्नी तिथे आली. आपले पती मोहित यांना दुसऱ्याच महिलेसोबत पाहून त्यांच्या पत्नीला राग अनावर झाला. त्यांनी मोहित यांना शिव्या देत चपलेने मारायला सुरुवात केली. या प्रकरणाचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्या व्हिडीओमध्ये मोहित सोनकर यांच्या पत्नी त्यांना चपलेने मारताना दिसत आहेत. हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे जेव्हा मोहित सोनकर यांना त्यांची पत्नी मारत होती, तेव्हा पोलीस देखील घटनास्थळी हजर होते. मात्र आपला पती दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करत आहे हे पासून त्या महिलेच्या संतापाचा पारा एवढा चढला होता की, त्यांनी पोलिसांसमोर आपल्या पतीला चपलेने मारले हा प्रकार सुरू असताना पोलीस देखील काहीच करू शकले नाहीत.

नेमकं प्रकरण काय?

घटनेबातब अधिक माहिती अशी की, हा सर्व प्रकार शनिवारी रात्री घडला आहे. भाजप नेता मोहित सोनकर हे एका भाजपाच्या महिला नेत्यासोबत बंददाराआड रोमान्स करत होते. तेव्हा तिथे अचानक त्यांची पत्नी आली. आपला पती दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करत आहे हे पाहून त्यांच्या पत्नीच्या संतापाचा पार चढला. त्यांनी तिथेच मोहित यांना चपलेने मारण्यास सुरुवात केली. घटनास्थळी पोलीस उपस्थित असून देखील ते काहीच करू शकले नाहीत.  मिळत असलेल्या माहितीप्रमाणे मोहित यांची पत्नी एकटी नव्हती तर त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्त देखील होते. या सर्वांनी मोहित यांना रस्त्यावर आणून मारहाण केली. हा व्हिडीओ प्रचंड व्यायरल झाला आहे.

 

महिला नेत्यालाही मारहाण

दरम्यान या सर्वप्रकरणात संबंधित भाजपाच्या महिला नेत्याला देखील मारहाण करण्यात आली आहे. मोहित आणि त्या महिलेला चांगलंच चपलेने मारण्यात आलं. या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. आता या दोन नेत्यांविरोधात पक्ष काय कारवाई करणार हे पहाणे महत्त्वाचं ठरणार आहे.