प्रेयसीचा सोबत यायला नकार, चिडलेल्या प्रियकराने आयुष्यच संपवले; कारण…

प्रेयसीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. ती त्याच्याबरोबर येण्यास तयार नव्हती म्हणून प्रियकराने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळते.

प्रेयसीचा सोबत यायला नकार, चिडलेल्या प्रियकराने आयुष्यच संपवले; कारण...
वीजेचा शॉक लागून मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू
Image Credit source: TV9
| Updated on: Sep 20, 2022 | 6:49 PM

रांची : प्रेम हा अडिच अक्षरांचा सुंदर मिलाप मानला जातो. पण वास्तवात हे प्रेमाचे नाते सध्या अनेकदा रक्तरंजित स्वरुप घेऊ लागले आहे. रांचीमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेतून याचाच प्रत्यय आला आहे. एका प्रियकरा (Boyfriend)ने संतापाच्या भरात त्याच्या प्रेयसी (Girlfriend)ला संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर तरुणीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक (Arrest) केली आहे.

प्रेयसीने सोबत यायला नकार दिल्याने उचलले टोकाचे पाऊल

प्रेयसीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. ती त्याच्याबरोबर येण्यास तयार नव्हती म्हणून प्रियकराने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळते. राजू ओराव असे प्रियकराचे नाव आहे.

वर्षभरापासून लिव्ह-इन मध्ये राहत होते तरुण-तरुणी

रांची येथील खाखसी टोला परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. राजू ओराव आणि तरुणी एक वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. करमा पर्वासाठी मुलगी तिच्या घरी गेली होती. तेव्हापासून ती तिथेच राहत होती.

आरोपी तरुणीवर सोबत येण्यासाठी दबाव टाकत होता

राजू अनेक दिवसापासून तरुणीला सोबत नेण्याचा प्रयत्न करत होता. मंगळवारीही आरोपी राजू हा त्याचा मित्र सोनूसह मुलीच्या घरी गेला. तेथे जाऊन तो प्रेयसीवर सोबत जाण्यासाठी दबाव टाकू लागला.

मात्र तरुणी काही कारणाने त्याच्यावर नाराज होती. यामुळे तिने त्याच्यासोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे चिडलेल्या राजूने तरुणीवर गोळ्या झाडल्या.

घटनेनंतर आरोपी फरार झाला, मात्र पोलिसांनी पकडला

मृत तरुणीच्या नातेवाईकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघेही तेथून फरार झाले. यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठत लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत चान्हो परिसरातून आरोपीला अटक केली.

प्रेयसीचे दुसऱ्याशी अफेअर असल्याचा संशय

आरोपी राजूला आपल्या प्रेयसीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यामुळेच ती आपल्याला सोडून तिच्या घरी गेली असे त्याला वाटायचे. त्यामुळे तो आपल्यासोबत येण्यासाठी तिला दबाव टाकत होता, अशी माहिती ग्रामीण एसपी नौशाद आलम यांनी सांगितले.