रिल्सच्या वेडातून युवतीकडून दोन भावांवर हल्ला, महिला पोलीस कॉन्स्टेबललाही मारहाण; नेमके काय आहे हे प्रकरण ?

याप्रकरणी फारुखाबादमधील मऊ दरवाजा पोलीस ठाण्यात दोघा भावांनी मोठी बहीण आरतीने गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली.

रिल्सच्या वेडातून युवतीकडून दोन भावांवर हल्ला, महिला पोलीस कॉन्स्टेबललाही मारहाण; नेमके काय आहे हे प्रकरण ?
पत्नी इन्स्टाग्रामवर वेळ घालवायची म्हणून पतीने केली हत्याImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 6:09 PM

उत्तर प्रदेश : सोशल मीडियात रिल्स (Reels) बनवण्याचे फॅड चांगलेच रुळले आहे. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच या रिल्सच्या छंदाने वेडावून टाकले आहे. पण हेच वेड जे हाणामारीपर्यंत पोहोचते, तेव्हा धक्काच बसतो. उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेने या रिल्सचा अतिरेक उघडकीस आणला आहे. व्हिडीओ रिल्स बनवण्यास रोखले (Prevented) म्हणून एका युवतीने आपल्या दोन भावांचा गळा घोटण्याचा अतिरेक केला. एवढेच नव्हे तर नंतर तिने महिला कॉन्स्टेबलची वर्दी फाडत तिला मारहाण (Beating)ही केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने फरिदाबादमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मऊ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

आकाश राजपूत आणि जयकिशन राजपूत अशी दोन भावांची नावे आहेत. याप्रकरणी फारुखाबादमधील मऊ दरवाजा पोलीस ठाण्यात दोघा भावांनी मोठी बहीण आरतीने गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार आरतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्याचे वेड होते

आकाशने सांगितले की, बहीण आरतीला रील्स बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याचे वेड होते. आजकाल त्याची बहीण ओव्हरबोर्ड जात होती आणि कोणतेही व्हिडिओ पोस्ट करत होती. यामुळे त्याचे मित्र त्याला टोमणे मारायचे आणि बहिणीची चेष्टा करायचे.

हे सुद्धा वाचा

रील बनवण्यास नकार दिला तर हल्ला केला

आकाशने असे हास्यास्पद व्हिडिओ बनवण्यास बहिणीला विरोध केला, तर तिने त्याच्यावर हल्ला केला. यावेळी त्याचा भाऊ जयकिशन त्याची सुटका करण्यासाठी मध्ये पडला असता त्यालाही बहिणीने मारहाण करत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही वडिलांसोबतही गैरवर्तन करते.

महिला कॉन्स्टेबलवरही हल्ला

मऊ दरवाजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर स्टेशन प्रभारी अमोद कुमार सिंह यांनी आरतीला पोलीस ठाण्यात आणण्यासाठी महिला कॉन्स्टेबल आणि होमगार्डला पाठवले.

तरुणीने पोलीस स्टेशनमध्येही हायव्होल्टेज ड्रामा केला आणि भाऊ आकाशला पाहून त्याच्यावर पुन्हा हल्ला केला. महिला कॉन्स्टेबलने तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता तिने त्यांनाही मारहाण केली.

तरुणीविरोधात दोन गुन्हे दाखल

याप्रकरणी आरतीवर दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याचे निरीक्षक अमोद कुमार सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, “एक कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि दुसरा महिला कॉन्स्टेबलला मारहाण, तिचा गणवेश फाडणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरतीची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.