प्रेमकथेचा भयानक शेवट! आधी प्रेयसीची हत्या, नंतर फेसबुक लाईव्ह करून त्यानेही संपवले जीवन

| Updated on: May 15, 2023 | 4:52 PM

Jharkhand News : रांचीच्या अर्गोरा पोलीस स्टेशन हद्दीतील पॉश एरिया असलेल्या हरमूमध्ये प्रियकराने प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर वेडा प्रियकर अंकितने फेसबुकवर लाईव्ह गोळी झाडून स्वत:चे आयुष्यही संपवले.

प्रेमकथेचा भयानक शेवट! आधी प्रेयसीची हत्या, नंतर फेसबुक लाईव्ह करून त्यानेही संपवले जीवन
प्रियकरासोबत पाहिले म्हणून मुलीने आईला संपवले
Image Credit source: tv9
Follow us on

रांची : बिहारच्या नवादा जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुण-तरूणीच्या प्रेमकथेचा रक्तरंजित (couple tragedy) शेवट झाला आहे. प्रेयसीने अचानक बोलणे बंद केल्याने आणि कॉल ब्लॉक झाल्याने संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीची (boyfriend shot girlfriend)गोळ्या घालून हत्या केली. एवढेच नव्हे तर तिच्या हत्येनंतर अवघ्या 24 तासांत सनकी प्रियकराने फेसबुकवर लाइव्ह करून गोळी झाडून (killed himself) आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना रांचीतील अरदोडा ठाणे क्षेत्रातील हरमूम या पॉश भागातील आहे.

फेसबुक लाईव्ह दरम्यान, आरोपीने हातात बंदूक घेऊन प्रेयसीचा खून केल्याची कबुली दिली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने त्याचे लोकेशन अनु आणि राधा या दोन बहिणींना पाठवले होते. 29 सेकंदाच्या या फेसबुक लाईव्हमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सर्वांसमोरच आपण प्रेयसीची हत्या केल्याचे कबूल केले. आता आपण तिच्याकडेच जाणार आहोत असे सांगत त्याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले.

सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून गर्लफ्रेंडची केली हत्या

12 मे रोजी रात्री उशिरा बिहारमधील नवादा जिल्ह्यातील पाकीबर्मा पोलीस स्टेशन परिसरात राहणारे प्रसाद यांच्या 20 वर्षीय मुलीचापोलीस स्टेशन हद्दीतील हरमू पटेल चौकात मृत्यू झाला होता. ती रांचीतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात बीबीएची अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. तिचा प्रियकर अंकित अहिर याने सर्वांसमोर गोळ्या झाडून तिची हत्या केली. यादरम्यान मृत विद्यार्थिनीची मैत्रीण सृष्टीही जखमी झाली.

फेसबुक लाईव्ह दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी अंकितने दिलेल्या माहितीनुसार, ते दोघं गेल्या 4 वर्षांपासून एकत्र होते. दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेण्यास सुरुवात केली. मात्र याच दरम्यान निवेदिताच्या घरच्यांना तिचे प्रेमप्रकरण कळले, घरच्यांनी फटकारल्यानंतर तिने अंकितशी बोलणे बंद केले. एवढेच नाही तर तिने त्याचा फोन नंबरही ब्लॉक केला होता. त्यामुळे अंकित मानसिक तणावाखाली होता.

पोलिस पोहोचण्यापूर्वीच केली आत्महत्या

12 मे रोजी हरमू येथील पटेल पार्कजवळ वसतिगृहात जात असताना अंकितने त्याच्या प्रेयसीला थांबवले आणि तिच्याशी न बोलण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात प्रेयसीने बोलण्यास नकार दिल्याने त्याने तिची गोळ्या झाडून हत्या केली. आणि तो पळून गेला होता. पोलिसांच्या सततच्या छाप्यामुळे आणि पकडले जाण्याच्या भीतीने तो रांचीच्या सदर पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या अयोध्यापुरी येथील एका पडक्या घरात लपून बसला. एकाच घरातून तो दोनदा फेसबुकवर लाईव्ह आला होता.

त्याच्या नातेवाइकांनी फेसबुकवर लाइव्ह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. मात्र ते तेथे पोहोचण्यापूर्वीच अंकितने त्याचे स्वत:चे जीवनही संपवले.