
नवी मुंबईतील कॅब चालकाने घाणेरडी मागणी केल्याने एका तरूणीने तिच्या प्रियकरासह मिळून त्याची हत्या केल्याचे प्रकरण सध्या खूप गाजत आहे. रिया सरकन्यासिंग (वय 19 वर्षे) व तिचा प्रियकर विशाल शिंदे (वय 21 वर्षे) यांनी ही हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर उलवे पोलिसांत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. ही हत्या अतिशय निर्घृणपणे करण्यात आली असून कॅब चालकावर हातोड्याने वार करून त्याचा जीव घेण्यात आला. एवढेच नव्हे तर त्याचे डोळेही फोडण्यात आले. हत्येनंतर मृतदेह चादरीत गुंडाळून घरातच ठेवण्यात आला होता. अखेर तीन दिवसांनी कॅब चालकाचा मृतदेह पोलिसांनी घरातून ताब्यात घेतला आणि आरोपींचा कसून शोध घेत त्यांना अटक करण्यात आली.
कॅब ड्रायव्हरची ही हत्या 2 एप्रिलला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिया सरकन्यासिंग आणि तिचा प्रियकर विशाल शिंदे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅब चालकाच्या हत्येनंतर (Crime News) दोघेही कॅब घेऊन पुणे, नाशिकला गेल्यानंतर तेथे त्यांच्या हातून घडलेल्या अपघातांमुळे या खुनाचा उलगडा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संजय पांडे ( वय 43) असे मृताचे नाव असून ते मोहगावात रहात होते. रविवारील त्यांच्या हत्येची घटना उघडकीस आली. तीन दिवसांनी त्यांच्या घरातून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. डोक्यावरती निर्घृणपणे हातोडीचे घाव घालून, आणि त्याचे डोळे फोडून त्यांची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह चादरीत गुंडाळून घरातच ठेवण्यात आला होता.
अशी झाली होती ओळख
रिया, विशाल हे दोघे पांडेच्या कॅबमधून नियमित पुण्याला जात असल्याने त्यांच्यात ओळख झाली होती. मात्र, घटनेच्या दिवशी पांडेच्या घरी रिया असताना तिथे विशाल आला होता. कॅबचालक पांडे ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप रियाने केल्यानंतर दोघांनी मिळून पांडेची निर्घृण हत्या केली. आधी हातोड्याने डोक्यावर वार केला, तसेच त्याचे डोळही फोडले. नंतर चादरीत गुंडाळून त्याचा मृतदेह घरातच ठेवला. हत्येनंतर त्याचीच कार व मोबाइल घेऊन रिया आणि विशाल हे दोघेही पुण्याला आले. मात्र, तिथे त्यांच्याकडून अपघात झाल्याने संबंधित वाहनचालक त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जात होते. पण त्याला चकवा देऊन ते नाशिकला पळून गेले.
दोघांनी दिली खुनाची कबुली
पुण्यातील अपघातानंतर चकवा देऊन पळून गेले, मात्र, शनिवारी रात्री नाशिकमध्येही त्यांच्याकडून अपघात झाल्यानंतर ते दोघे पोलिसांना सापडले. कार मालकाबद्दल केलेल्या चौकशीत त्यांनी कॅबचालक पांडेची हत्या केल्याची कबुली दिली. नाशिक पोलिसांनी याबाबत कळवले असता पांडेच्या घरझडतीमध्ये मृतदेह मिळाल्याचे सहायक पोलिस आयुक्त विशाल नेहूल यांनी सांगितले आहे.
कार चालवता येत नसल्यामुळं अपघात
कॅबचालक पांडेची कार घेऊन दोघे पळून गेले असता त्यांना कार चालवता येत नसल्याने त्यांच्याकडून पुण्यात अपघात झाला. यावेळी समोरील वाहनधारक त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जात होते. मात्र, त्यांना चकवा देऊन ते नाशिकला पळाले. तिथेही त्यांच्याकडून अपघात झाला त्यानंतर ते पोलिसांच्या हाती लागले. गाडी पांडेच्या नावावर असल्याचे चौकशीत समोर आले असता हा प्रकार उघड झाला. त्यानंतर उलवे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे