Buldana Crime : धक्कादायक! शेतीच्या वादातून महिलेची हत्या, चार जण गंभीर जखमी, 7 जण अटकेत

शेतीच्या वादामुळे झालेल्या हाणामारीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. कुशीवर्ताबाई धुड असे मृत्यू महिलेचे नाव आहे. वादामध्ये मृत्यू झाल्याने महिलेच्या नातेवाईकांनी जोपर्यंत या घटनेतील दोषी आरोपींना अटक होत नाहीय, तोपर्यंत मृतक कुशीवर्ताबाई यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. यामुळे परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Buldana Crime : धक्कादायक! शेतीच्या वादातून महिलेची हत्या, चार जण गंभीर जखमी, 7 जण अटकेत
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 03, 2022 | 2:31 PM

बुलडाणा : अंढेरा पोलीस स्टेशन (Police station) अंतर्गत येणाऱ्या काटोडा येथे शेतीच्या वादामुळे झालेल्या हाणामारीमध्ये एका महिलेचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडलीयं. हा सर्व प्रकार 2 जुलै रोजी घडल्याचे कळते आहे. या घटनेमध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा (Crime) दाखल करत 7 आरोपींना पोलिसांनी अटकही केलीयं. मात्र, शेतीचा वाद इतका जास्त टोकाला पोहचल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी (Police) पुढील तपास करण्यास सुरूवात केलीयं.

कुशीवर्ताबाई धुड असे मृत्यू वृद्ध महिलेचे नाव

शेतीच्या वादामुळे झालेल्या हाणामारीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. कुशीवर्ताबाई धुड असे मृत्यू महिलेचे नाव आहे. वादामध्ये मृत्यू झाल्याने महिलेच्या नातेवाईकांनी जोपर्यंत या घटनेतील दोषी आरोपींना अटक होत नाहीय, तोपर्यंत मृतक कुशीवर्ताबाई यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. यामुळे परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी दिला नकार

याप्रकरणात मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ तपास पूर्ण करत या घटनेतील सर्व आरोपीना अटक केलीय. सर्व आरोपींना अटक केल्यानंतरच नातेवाईकांनी मृतक महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.