कंगणाची आठवण पाटलांना आली ? सुषमा अंधारेवर गुन्हा दाखल झाल्यावर पाटील म्हणाले कसं वाटलं ?

| Updated on: Oct 12, 2022 | 8:57 PM

नाशिक : भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय. यामध्ये त्यांनी अभिनेत्री कंगणा रानौतचे नाव न घेता खळबळ उडवून देणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, मी कुणाच्या नावाचा उल्लेख करत नाही, मात्र सोशल मिडियात पोस्ट केली म्हणून […]

कंगणाची आठवण पाटलांना आली ? सुषमा अंधारेवर गुन्हा दाखल झाल्यावर पाटील म्हणाले कसं वाटलं ?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय. यामध्ये त्यांनी अभिनेत्री कंगणा रानौतचे नाव न घेता खळबळ उडवून देणारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, मी कुणाच्या नावाचा उल्लेख करत नाही, मात्र सोशल मिडियात पोस्ट केली म्हणून समज देण्याऐवजी दीड दीड महिना समाजातल्या कलाकाराला अनेक पोलीस स्टेशनमध्ये फिरवलं तेव्हा कसं वाटलं ? असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना आठवण करून दिली आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी रोख धरला होता. सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला यावर मी बोलत नाही असे म्हणत पाटील यांनी अडीच वर्षात काय झालं ? जे तुम्ही केलं टे कसं वाटलं म्हणून थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय सुषमा अंधारे यांच्या बरोबरच विनायक राऊत, भास्कर जाधव या ठाकरे समर्थकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकूणच यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असून ठाकरे गटाकडून याबाबत जोरदार हल्लाबोल केला जात असून अटकेची कारवाईची टांगती तलवार या तिघांवर आहे.

याच गुन्ह्यासंदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कंगणाचे नाव न घेता तुम्ही सोशल मिडियात पोस्ट केली म्हणून समज देण्याऐवजी दीड दीड महिना समाजातल्या कलाकाराला अनेक पोलीस स्टेशनमध्ये फिरवलं तेव्हा कसं वाटलं ?

असा सवाल उपस्थित करून ठाकरे गटाला जाब विचारला आहे. मात्र यावेळी तुम्ही जे केलं टे आम्ही केलं असे पाटलांना म्हणायचे होते का ? अशीही कुजुबूज आता सुरू झाली आहे.