AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : उस्मान तारीकचा सामना कसा करणार? इशान किशनने प्लानच सांगून टाकला

भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याची आतापासून क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. यात इशान किशन विरुद्ध उस्मान तारिक सामन्याबाबत चर्चा होत आहे. पण इशानला काय वाटते? ते जाणून घ्या.

IND vs PAK : उस्मान तारीकचा सामना कसा करणार? इशान किशनने प्लानच सांगून टाकला
IND vs PAK : उस्मान तारीकचा सामना कसा करणार? इशान किशनने प्लानच सांगून टाकलाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 13, 2026 | 6:57 PM
Share

भारत पाकिस्तान सामन्यात खेळाडूंनी केलेली एक चूक आयुष्यभरासाठी जखम राहते. त्यामुळे या सामन्यात चूक घडू नये यासाठी खेळाडू प्रयत्नशील असतात. भारत पाकिस्तान सामना फक्त मल्टिनेशन स्पर्धेतच होतो. त्यामुळे हा सामना क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरतो. भारत पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारीकची खूपच स्तुती होत आहे. भारतीय फलंदाजांना अडचणी आणेल असं सांगितलं जात आहे. त्यात गेल्या महिन्यात भारताची फिरकीविरुद्धची खेळी काही खास राहिली नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. असताना उस्मान तारीकबाबत विकेटकीपर फलंदाज इशान किशनला विचारलं गेलं. तेव्हा त्याने आपल्या शैलीत त्याचं उत्तर दिलं.

इशान किशनने नामिबियाविरूद्धच्या सामन्यात आक्रमक खेळी केली होती. या सामन्यात फिरकी गोलंदाजाचा सामना करताना इशानचं रौद्र रूप दिसलं होतं. असं असताना इशान किशनने सांगितलं की, गेरहार्ड इरास्मसचा सामना करणे ही काय तारिकची तयारी म्हणून नाही. भारतीय संघाने आधीच तयारी केली आहे. इशान किशनने सांगितलं की, ‘आम्ही आधीच तयारी केलेली आहे. आम्ही फक्त चेंडू पाहून आमचा नैसर्गिक खेळ खेळण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. जर बॉल मारण्यासारखा असेल तर आम्ही नक्कीच मारू. आम्हाला आमच्या ताकदीवर विश्वास लागेल. ‘ इशान किशनने आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केलं की भारताची तयारी पूर्ण आहे. आता फक्त सामन्यात त्याची योग्य अमलबजावणी करणं गरजेचं आहे. आम्ही काही व्हिडिओ पाहतो आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करावा लागेल याची कल्पना येते, असंही तो पुढे म्हणाला.

भारतीय संघाची फिरकीविरुद्ध कमकुवत बाजू दिसून आली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ भारताला अडचणीत आणेल असं बोललं जात आहे. पाकिस्तानच्या ताफ्यात अबरार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, सईम अयुब आणि उस्मान तारिक या सारखे फिरकीपटू आहेत. त्यामुळे फिरकीचा सामना करून मोठी धावसंख्या करण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडे, इशान किशनला संजू सॅमसनसोबतच ओपनिंग करावी लागेल असं दिसत आहे. कारण अभिषेक शर्मा फिट नसल्याचं कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं आहे. त्यात संजूचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड