Thane Crime : लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यांमध्ये जुंपली, दोन गटातील तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

हल्ल कोण कोणत्या कारणातून काय करेल, याचा नेम नाही. हाणामारी आणि भांडण करायला लोकांना कारणाची गरज नाही. क्षुल्लक कारणातून हाणामारीच्या घटना घडतात.

Thane Crime : लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यांमध्ये जुंपली, दोन गटातील तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
लहान मुलांच्या भांडणातून दोन गटात हाणामारी
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 12, 2023 | 2:38 PM

भिवंडी / 12 ऑगस्ट 2023 : हल्ली छोट्या छोट्या कारणातून मारामारी, हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही सर्व घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीत सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपाचारासाठी भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी चौघांना कळवा रुग्णायलयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

भिवंडी शहरातील नवी वस्ती नेहरुनगर येथील झोपडपट्टीत शेजाऱ्यांमध्ये ही घटना घडली. शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन मुलांमध्ये गुरुवारी सायंकाळी भांडण झालं होतं. या भांडण प्रकरणी एका गटाने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसात तक्रार दिल्याने दुसरा गट संतापला. तक्रारीचा राग मनात धरुन दुसरा गट पहिल्या गटावर तक्रार मागे घेण्यास दबाव टाकू लागला.

तक्रार मागे घ्या अन्यथा तुम्हाला मारहाण करु, अशी धमकी दुसऱ्या गटाने दिली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी एका गटाकडून जोरदार हल्ला करत तुंबळ हाणामारी सुरु झाली. दोन्ही गटाकडून एकमेकांना लाकडी दांडके आणि हाताने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सहा जण जखमी झाले. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. सर्व जखमींना भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चौघांना अधिक उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल केले.