
चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : हाणामारीमुळे नेहमी चर्चेत असलेल्या संदीप फाउंडेशन (Sandip Faundation) तथा संदीप विद्यापीठातील (Sandip University) आणखी एक राडा समोर आला आहे. फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या दोन गटात झालेला हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी असून त्याच्यावर चार दिवसांपासून एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील असलेल्या या विद्यापीठात नेहमी विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीच्या घटना समोर येत असतात. त्यातच आत्ता समोर आलेला व्हिडिओ बघून विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याच विद्यापीठाच्या आणि कॉलेजच्या आवारात वारंवार होणाऱ्या हाणामारीच्या घटनांनी बाहेरून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. याशिवाय विद्यार्थिनींमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या संदीप विद्यापीठाच्या गेटवरच विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.
कॉलेजच्या आवारातच दोन गटात तुफान हाणामारी झाल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती, हा धक्कादायक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या दोन तरूणांमध्ये झालेल्या किरकोळ वादाच पर्यावसन जबर हाणामारीत झाले आहे.
या तुंबळ हाणामारीत एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत नाशिकच्या खाजगी रुग्णालयात गेल्या चार दिवसापासून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांची प्रकृती गंभीर असून या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल झाला आहे.
विशेष म्हणजे विद्यापीठ तथा कॉलेजच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या बाऊन्सर समोर झाली घटना झाली होती.
याच कॉलेजच्या आवारात वारंवार होणाऱ्या हाणामारीच्या घटनांनी बाहेरून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे.
हाणामारीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्याने या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.