
देशातील विमानतळांवर रोज परदेशातून तस्करी करणाऱ्यांवर अधिकारी नजर ठेवत असतात. तरीही परदेशातून येणारे तस्कर रिस्क घेतच असतात. तस्करीसाठी रोज नवनवे फंडे वापरले जात असतात. आता मुंबईतील विमानतळावर एका परदेशी महिलेला संशयावरुन हटकले असताना तिने अधिकाऱ्यांना चॉकलेट देऊ लागली. अधिकाऱ्यांना तिच्याकडे ओरिओ आणि चॉकलेटचे डब्बे मिळाले. ज्याची संशयावरुन तपासणी केली असता त्यात ६२.६ कोटींचे कोकेन सापडले आहे.
डीआरआयच्या मुंबईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की एअरपोर्टवर दोहावरुन आलेल्या एका महिलेची झडती घेतली असता तिच्याकडे ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेट्सच्या डब्यात लपवलेल्या ३०० कॅप्सुलमध्ये सहा किलोग्रॅमहून अधिक कोकेन सापडले आहे. या कोकनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ६२.६ कोटी रुपये आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की या कॅप्सुल ओरिओ बिस्कीट्सच्या सहा डब्यात आणि चॉकलेट्सच्या तीन डब्यात पॅक केले होते. दोहावरुन ही परदेशी महिला मुंबईत आली होती. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहीती मिळाली होती.त्यावरुन तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्याकडे हे कोकीन सापडले आहे.
दोहातून तस्करीद्वारे कोकेन आणले जात असल्याची टीप डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. १४ जुलै रोजी मुंबई विमानतळावर संशयित महिलेला अधिकाऱ्यांनी रोखले तर तिने काही नाही चॉकलेट्स आहेत तुम्हाला हवेत का अशी विचारणा केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तिच्या चॉकलेट्सचे बॉक्स उघडून चेक केले तर अधिकाऱ्यांना देखील धक्का बसला. सामानाची तपासणी केली अशताना ६ ओरिओ बिस्कीटाचे बॉक्स आणि ३ चॉकलेट्सचे बॉक्स सापडले.कॅप्सुल उघडल्यानंतर सफेद पावडर सारखा पदार्थ मिळाला. तपासणीनंतर ते कोकन असल्याचे स्पष्ट झाले.महिलेकडे एकूण ३०० अशा कॅप्सुल सापडल्या आहेत.
सुरुवातीला अधिकाऱ्यांना समजले नाही हे नेमके काय आहे. त्यानंतर टेस्ट किट्सद्वारे ही पावडर तपासली असताना ते कोकेन असल्याचे कन्फर्म झाले. या कोकेनची किंमत काळ्या बाजारात ६२.६ कोटी आहे.नार्कोटिक्स ड्रग्स एण्ड सायकोट्रोपिक सब्सटन्स ( एनडीपीएस ) अधिनियम १९८५ अंतर्गत या मुद्देमाल जप्त केला आहे. महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.