Crime News : घरफोडी करताना दरोडेखोर सीसीटिव्हीत कैद, मग पोलिस लागले कामाला

बंगल्यांचा कानोसा घेत घरात शिरले, सीसीटिव्हीत दरोडेखोर कैद, आता पोलिसांची परीक्षा सुरु

Crime News : घरफोडी करताना दरोडेखोर सीसीटिव्हीत कैद, मग पोलिस लागले कामाला
सीसीटिव्ही व्हिडीओ
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 27, 2023 | 9:52 AM

संगमनेर : संगमनेर (Sagamner) शहरालगतच्या ग्रामीण भागात (Rural Area) चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळ्यांनी आता आपले लक्ष्य शहराकडे वळविल्याचे समोर आले असून दरोडेखोर घरफोडी करताना सिसीटीव्हीत कैद (CCTV Video) झाले आहेत. शहरातील गोल्डनसिटी परिसरात जवळपास सहा सशस्त्र दरोडेखोरांनी या परिसरातील अनेक बंगल्यांचा कानोसा घेवून त्यातील दोन बंगले फोडले.

या घटनेत एका महिलेच्या घरातून सव्वा तोळ्यांच्या दागिन्यांसह आठ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली, तर बंद असलेल्या दुसर्‍या घरात शोधाशोध करुनही दरोडेखोरांना काहीच सापडले नाही. या दरोडेखोरांना जेरबंद करण्याच आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. सीसीटिव्हीत कैद झालेल्या दरोडेखोरांचा पोलिस शोध घेत आहेत.