बुलडाण्यात सैराट! पळून जाऊन लग्न, पोलीस स्टेशनच्या बाहेरच तरुणाला संपवण्याचा प्रयत्न

| Updated on: Jan 05, 2022 | 10:48 AM

आधी बाचाबाची आणि त्यानंतर जीवघेणा हल्ला करण्यात आला. रघूच्या पोटात धारदार शस्त्रानं वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं जातंय. दरम्यान, या सगळ्यात रघू तिवारी हा तरुण गंभीर जखमी झाला.

बुलडाण्यात सैराट! पळून जाऊन लग्न, पोलीस स्टेशनच्या बाहेरच तरुणाला संपवण्याचा प्रयत्न
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

बुलडाणा : सैराट सिनेमासारखा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडला आहे. पळून जाऊन लग्न केलेल्या एका युवतीच्या कुटुंबीयांनी तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. प्रेम प्रकरणातून (Love) एका युवकावर प्राणघातक हल्ला (Attack) झाला असल्याचं बोललं जात असून यात युवक गंभीर जखमी झाला आहे. सध्या गंभीर जखमी असलेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस स्टेशनच्या (Police Station) बाहेरच ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी आता पोलिसांना तक्रारदेखील देण्यात आली आहे.

काय प्रकरण?

बुलडाणा जिल्ह्यात राहणारा रघू तिवारी हा 26 वर्षांचा मुलगा. खामगावच्या सती फैलचा रहिवासी असलेल्या रघूचं एका मुलीवर प्रेम होतं. त्यानं एका युवतीसोबत पळून जाऊन लग्न केलं. पण मुलीच्या घरच्यांचा या विवाहाला विरोध होता. त्यामुळे पळून जावून लग्न केल्याचा दावा रघू यांनी केलाय. याबाबतच रात्री जेव्हा ते जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. पण जबाब नोंदवल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी युवकाशी पोलीस स्टेशनच्या बाहेर हुज्जत घातली.

पोलिसांचा धाक आहे की नाही?

आधी बाचाबाची आणि त्यानंतर जीवघेणा हल्ला करण्यात आला. रघूच्या पोटात धारदार शस्त्रानं वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं जातंय. दरम्यान, या सगळ्यात रघू तिवारी हा तरुण गंभीर जखमी झाला. हा सगळा थराराक घटनाक्रम पोलीस स्टेशनच्या बाहेरच घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. शिवजीनगर पोलीस स्टेशनच्या समोरच ही घटना घडली. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला होता.

कुणावर कारवाई होणार?

दरम्यान, या संपूर्ण वादात रघू तिवारी गंभीर जखमी झाला असल्याचं पाहून त्याला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रथम उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात रघूवर उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती खालावल्यानं त्याला पुढील उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आलंय. या संपूर्ण प्रकरणी आता रघूच्या नातलगांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस याप्रकरणी काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

इतर बातम्या –

‘…म्हणून मी बाईकवर नको ते चाळे केले’ रोडरोमियोची औरंगाबाद पोलिसांसमोर कबुली, म्हणाला…

चाकूचा धाक दाखवून गोपालला लुटायचा प्लान होता, प्लान फसला! गोपालनेच एकाला भोसकलं

Ahmednagar Suicide: अहमदनगरमध्ये गोदावरीत उडी घेऊन महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

विवाहित प्रेयसीसोबत नगरहून कोल्हापूर गाठलं, धर्मशाळेत प्रेमी युगुलाचा गळफास, चार आयुष्यं उद्ध्वस्त