‘…म्हणून मी बाईकवर नको ते चाळे केले’ रोडरोमियोची औरंगाबाद पोलिसांसमोर कबुली, म्हणाला…

'...म्हणून मी बाईकवर नको ते चाळे केले' रोडरोमियोची औरंगाबाद पोलिसांसमोर कबुली, म्हणाला...

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या औरंगाबादच्या रोडरोमियोला पोलिसांनी अटक केली आहे. धावत्या दुचाकीवरून एकमेकांना मिठी मारत अश्लील चाळे करत या जोडप्यानं सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 05, 2022 | 10:20 AM

औरंगाबादः सोशल मीडियावर धुमाकूळ (Aurangabad Viral video ) घालणाऱ्या औरंगाबादच्या व्हिडिओतील रोडरोमियोला पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडिओत धावत्या दुचाकीवरून कपलने  एकमेकांना मिठी मारत अश्लील चाळे करत सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या. रस्त्यावरून जाणाऱ्यानं या सीनचा व्हिडिओ काढला, त्यालाही ते अत्यंत लाजिरवाणं वाटलं. पण पाहता पाहता हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. औरंगाबाद पोलिसांनी या गोष्टीची दखल घेत अवघ्या 24 तासात या रोडरोमियोला अटक केली.

कोण आहे हा रोडरोमियो?

पोलिसांनी या रोडरोमियोचा तपास करून त्याला शोधले. एवढ्या जीवघेण्या आणि अश्लील कृत्याचे कारण विचारले. तेव्हा चौकशीतून सगळे सत्य समोर आले. सूरज गौतम कांबळे (23,रा. बीड बायपास) असे या तरुणाचे नाव आहे. सूरज हा सूतगिरणी चौकातील कापड दुकानाच सेल्समन आहे. तो एमएमचे शिक्षण घेतो. वडील गवंडी काम करततात. त्याची प्रेयसीदेखील महाविद्यालयात शिक्षण घेते. हे दोघेही नातेवाईक असून काही दिवसात लग्न करणार आहेत, असे त्याने सांगितले.

व्हिडिओ करण्याचे कारण उघड केले…

सूरजने सांगितले, तो आणि त्याच्या मित्रांनी 31 डिसेंबरच्या रात्री तडप सिनेमाचे ट्रेलर पाहिले. मित्रांनी त्याला ट्रेलरमधील स्टंट करण्याचे चॅलेंज दिले. त्यानेही चॅलेंज स्वीकारत प्रेयसीला बोलावून घेतले. क्रांती चौक ते सेव्हन हिल आणि सेव्हन हिल ते क्रांती चौक असा प्रवास करत हा स्टंट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरातील रस्त्यावर हे काय सुरु आहे, असे म्हणत कारवाईचे निर्देश दिले. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक अनंता तांगडे आणि कर्मचाऱ्यांनी तपास करून त्याला ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल संतोष बमनावत यांनी त्याच्याविरोधात फिर्याद नोंदवली.

बाईकवर केले होते नको ते चाळे

या युगुलानं धावत्या दुचाकीवर एकमेकांना मिठी मारली. हे प्रकरण फक्त मिठी मारण्यापर्यंत थांबलं नाही. त्यापुढची अनेक जीवघेणी पावलंही उचलली. भररस्त्यात धावत्या दुचाकीवर या युगुलानं अश्लील चाळे करत सगळ्या सीमा ओलांडल्या. गाडीवरच या जोडप्यानं एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर अश्लील चाळे केले. धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे करणारे हे स्टंटबाज युगुल कॅमेऱ्यात कैद झाले.

इतर बातम्या-

VIDEO : लग्नामध्ये नवरीची धडाकेबाज एन्ट्री, वऱ्हाडी मंडळी आश्चर्याने पहातच राहिले…पाहा व्हायरल व्हिडिओ!

Nagpur NMC | पाचशे चौरस फुटाच्या मालमत्तांची करमाफी होणार?; मनपाच्या करसंकलन समितीने घेतला महत्त्वाचा निर्णय 


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें