परत एकदा खऱ्या प्रेमाचा भयंकर शेवट! त्याने जीव लावला पण तिने केला घात, त्या रात्री नेमकं काय घडलं?

| Updated on: May 25, 2023 | 6:30 PM

प्रेम कहाणीचा शेवट एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे...., नवऱ्याच्या माघारी महिला पोलीस कॉन्सटेबलने प्रियकरासोबत थाटला संसार पण 'त्या' रात्री त्यालाच....

परत एकदा खऱ्या प्रेमाचा भयंकर शेवट! त्याने जीव लावला पण तिने केला घात, त्या रात्री नेमकं काय घडलं?
Follow us on

मुंबई : आपण दररोजच वेगवेगळ्या गुन्हांबद्दल वाचत ऐकत असतो. गुन्हा केल्यानंतर पोलीस आरोपींचा कसून शोध घेत असतात. घडलेल्या प्रकरणाची चौकशी करत गुन्हेगारांना शिक्षा आणि पीडित व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न पोलीस करतात. पण तामिळनाडूमध्ये पोलिसांनाच काळीमा फासणारी घटना घडली आहे. तामिळनाडू येथील चेंगलपट्टू याठिकाणी वाहतूक पोलीस शाखेत काम करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल मोठा गुन्हा केला आहे.. महिला पोलीस कॉन्स्टेबलने नव्या प्रियकराच्या मदतीने पूर्व प्रियकराची हत्या केली आहे.. महिला पोलीस कॉन्स्टेबलचा पूर्व प्रियकर हा उद्योजक होता. हत्या करून महिला कॉन्स्टेबल आणि प्रियकर फरार आहे. आता याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे..

तामिळनाडुच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात वाहतूक पोलिस शाखेत संगीता कॉन्स्टेबल कार्यरत आहेत. तीन वर्षांपूर्वी संगीता यांच्या पतीने स्वतःचे आयुष्य संपवलं होतं. पतीच्या निधनानंतर संगीता यांची ओळख मनोहरन (२६) नावाच्या व्यक्तीसोबत झाली.. मनोहरन एक उद्योजक असून तो पट्टाली मक्कल काचीचा चेंगलपट्टू येथील पदाधिकारी देखील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता यांनी मनोहरन याच्यासोबत असलेले संबंध संपवले होते. त्यानंतर संगीता आणि परिसरातील अन्य उद्योजक अरुण कुमार यांच्यातील नातं घट्ट झालं होतं.. नातं संपलं असताना देखील मनोहरन कायम संगीता यांचा पाठलाग करायचा. या गोष्टीचा संगीता यांना याचा त्रास होवू लागला होता. याबद्दल संगीता यांनी अरुण कुमारला सांगितलं होतं. यामुळे अरुण याने संगीता यांना पू्र्व प्रियकर मनोहरन याच्या संपर्कात राहण्यास आणि त्याच्यावर नजर ठेवण्यात सांगितलं.

दरम्यान, २२ मे रोजी मनोहरन त्याच्या घरी परतत होता. तेव्हाच संगीता यांचा अजितकुमार आणि त्याच्या काही साथीदारांनी मिळून मनोहरन याचं प्राण घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अजित कुमार (२६), षनमुगसुंदरम (२४), आर. बुपालन (२५), ए. अबिनेश (२३) आणि एन. अजितकुमार (२५) यांना अटक केली. सध्या पोलीस फरार संगीता आणि अरुण कुमार यांच्या शोधात आहेत.

या धक्कादायक घटनेनंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे.. घटना एखाज्या सिनेमाच्या कथेप्रमाणे असल्यामुळे सर्वत्र घटनेची तुफान चर्चा रंगत आहे. याप्रकरणातील अरोपींनी कठोर शासन करु असं देखील वक्तव्य पोलिसांनी केलं आहे..