
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या स्वभावाबद्दल व्यक्त होणं टाळा. कारण यामुळे तुम्ही नेमके कसे आहात याचा अंदाज आरोपींना येऊ शकतो.

दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमचे सोशल मीडिया अकाऊंट्सचे प्रोफाईल लॉक करा. त्यानंतर तुम्ही ज्यांना ओळखत असाल त्यांनाच फ्रेंड लिस्टमध्ये घ्या.

सोशल मीडियावर तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सर्व डिटेलमध्ये शेअर करण टाळा. त्यासोबतच तुमची बर्थ डेट सांगू नका.

तुमच्या वाढदिवसाचं निमित्त साधत शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने संपर्क करून ओळख करून तुमचा विश्वास जिंकत तुमची फसवणूक करू शकतो.

तुमचे वैयक्तिक आयुष्य सार्वजनिकपणे मांडताना थोडी काळजी घ्या, नाहीतर तुम्ही सहज अशा ट्रॅपमध्ये सापडले जावू शकता.तुमचे वैयक्तिक आयुष्य सार्वजनिकपणे मांडताना थोडी काळजी घ्या, नाहीतर तुम्ही सहज अशा ट्रॅपमध्ये सापडले जावू शकता.