Cyber Crime | ऑनलाईन घोटाळ्यापासून स्वतःचा बचाव कसा कराल?

| Updated on: Aug 10, 2021 | 9:52 AM

आपली सामाजिक सुरक्षा, बँक खाते किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक यांसारखी वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी कुठलीही कायदेशीर संस्था कॉल, ईमेल किंवा मेसेज करणार नाहीत.

Cyber Crime | ऑनलाईन घोटाळ्यापासून स्वतःचा बचाव कसा कराल?
Cyber Crime
Follow us on

मुंबई : ऑनलाईन व्यवहार करताना सायबर गुन्हेगार कशाप्रकारे तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, हे आपण लेखाच्या पूर्वार्धात पाहिलं. खतरा या खौफ म्हणजे बक्षिसाचे आमिष किंवा अडचणीत सापडल्याची भीती दाखवून सायबर गुन्हेगार तुम्हाला लुबाडू शकतात. अशा घोटाळ्यांपासून चार हात लांब राहण्यासाठी काय करता येईल, हे आपण लेखाच्या दुसऱ्या भागात जाणून घेणार आहोत.

गडबड कशी ओळखावी?

1. घोटाळेबाज तुमच्या ओळखीच्या संस्थेचे असल्याचे भासवतात
2. घोटाळेबाज म्हणतात की समस्या किंवा बक्षीस आहे
3. घोटाळेबाज तुम्हाला त्वरित कार्य करण्यास प्रवृत्त करतात
4. घोटाळेबाज तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने पैसे देण्यास सांगतात

घोटाळा टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

ब्लॉक करा – नकोसे (अनवाँटेड) कॉल आणि टेक्स्ट मेसेज ब्लॉक करा, म्हणजे भविष्यात ते तुम्हाला पुन्हा संपर्क करण्याची शक्यताही संपते.

वैयक्तिक माहिती देऊ नका– आपण अनपेक्षित विनंतींना प्रतिसाद देताना आपली वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती देऊ नका. आपली सामाजिक सुरक्षा, बँक खाते किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक यांसारखी वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी कुठलीही कायदेशीर संस्था कॉल, ईमेल किंवा मेसेज करणार नाहीत.

अज्ञात लिंकवर क्लिक करु नका – जर तुम्ही नियमित व्यवहार करत असलेल्या एखाद्या कंपनीकडून ईमेल किंवा मजकूर आला असेल आणि तुम्हाला ते खरे वाटत असेल, तरीही कोणत्याही लिंकवर क्लिक न करणेच केव्हाही हितावह ठरणारे आहे. त्याऐवजी, तुम्हाला माहिती असलेल्या अधिकृत वेबसाईटचा वापर करून त्यांच्याशी संपर्क साधा. किंवा त्यांचा फोन नंबर पाहा. मात्र त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉल करू नका.

घाई टाळा – त्वरित पावलं उचलण्याच्या दबावाला बळी पडू नका. अस्सल व्यवसाय करणाऱ्या संस्था तुम्हाला निर्णय घेण्यासाठी वेळ देतील. जो कोणी तुमची वैयक्तिक माहिती देण्यास किंवा त्यांना शुल्क देण्यास दबाव आणतो तो घोटाळा करणारा आहे.

गिफ्ट कार्डने पैसे देऊ नका – स्कॅमर्स तुम्हाला कसे पैसे देण्यासाठी सांगतात, ते जाणून घ्या. गिफ्ट कार्डने किंवा मनी ट्रान्सफर सेवेचा वापर करून तुम्ही पैसे देण्याचा आग्रह करणाऱ्या व्यक्तीला कधीही पैसे देऊ नका. आणि कधीही चेक जमा करू नका आणि कोणाला पैसे परत पाठवू नका.

थांबा आणि तुमच्या विश्वासू व्यक्तीशी बोला – आपण दुसरे कुठलेही पाऊल उचलण्यापूर्वी, मित्र, कुटुंबातील सदस्य, शेजारी अशा कुठल्याही विश्वासार्ह व्यक्तीशी बोला. त्यांच्याशी बोलल्याने आपल्याला हा घोटाळा आहे का, हे समजण्यास मदत होऊ शकते.

साभार – https://www.consumer.ftc.gov/

संबंधित बातम्या :

Cyber Crime | खतरा या खौफ, सायबर गुन्हेगारांना कसे ओळखावे?