Cyber Crime | खतरा या खौफ, सायबर गुन्हेगारांना कसे ओळखावे?

तुम्ही सरकारी कामकाजादरम्यान गफलत केल्याने अडचणीत आले आहात किंवा तुम्ही सरकारचे पैसे देणे लागता किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्याला तात्काळ मदतीची गरज आहे किंवा तुमच्या संगणकावर व्हायरस आहे, असं घोटाळेबाज भासवू शकतात

Cyber Crime | खतरा या खौफ, सायबर गुन्हेगारांना कसे ओळखावे?
cyber fraud

मुंबई : टेक्नोसॅव्ही जगामध्ये आजकाल प्रत्येक जण आपले व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करण्यावर भर देताना दिसतो. अगदी मोबाईल रिचार्जपासून तिकिटांचे बूकिंग, मोठमोठ्या वस्तूंची खरेदी यासारखे अनेक ट्रँझॅक्शन एका क्लिकवर करता येतात. मात्र सोप्पे झालेले हे ई-व्यवहार करताना काही गोष्टींची काळजी घेणंही तितकंच अनिवार्य आहे. अन्यथा आपण फसवणुकीला बळी पडून फार मोठी किंमत चुकवावी लागू शकते. खतरा या खौफ म्हणजे बक्षिसाचे आमिष किंवा अडचणीत सापडल्याची भीती दाखवून सायबर गुन्हेगार तुम्हाला लुबाडू शकतात.

गडबड कशी ओळखावी?

1. घोटाळेबाज तुमच्या ओळखीच्या संस्थेचे असल्याचे भासवतात

घोटाळेबाज अनेकदा सरकारच्या वतीने तुमच्याशी संपर्क साधण्याचे नाटक करतात. ते सोशल सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशन, आयआरएस किंवा मेडिकेअर सारखे खरे नाव वापरू शकतात किंवा अधिकृत भासणारे नाव बनवूही शकतात. काही जण आपल्या ओळखीच्या व्यवसायाचे ढोंग करतात जसे एखादी युटिलिटी कंपनी, टेक कंपनी किंवा अगदी देणगी मागत असल्याचा आवही आणला जातो.

तुमच्या कॉलर आयडीवर दिसणारा फोन नंबर बदलण्यासाठी ते तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यामुळे तुम्हाला दिसणारे नाव आणि क्रमांक कदाचित खरा नसेल.

2. घोटाळेबाज म्हणतात की समस्या किंवा बक्षीस आहे

तुम्ही सरकारी कामकाजादरम्यान गफलत केल्याने अडचणीत आले आहात किंवा तुम्ही सरकारचे पैसे देणे लागता किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्याला तात्काळ मदतीची गरज आहे किंवा तुमच्या संगणकावर व्हायरस आहे, असं घोटाळेबाज भासवू शकतात

काही घोटाळेबाज म्हणतात की तुमच्या एका खात्यात समस्या आहे आणि तुम्हाला काही माहिती पडताळणे आवश्यक आहे. इतर काही जण तुम्हाला लॉटरी किंवा स्वीपस्टेकमध्ये पैसे जिंकल्याचे आमिष दाखवतील, पण ते मिळवण्यासाठी फी भरावी लागेल, असेही सांगतील.

3. घोटाळेबाज तुम्हाला त्वरित कार्य करण्यास प्रवृत्त करतात

तुम्ही मेंदू चालवून विचार करण्यापूर्वी कृती करावी अशी घोटाळेबाजांची इच्छा असते. जर तुम्ही फोनवर असाल, तर ते तुम्हाला फोन ठेवू देणार नाहीत, अन्यथा तुम्ही खरं-खोटं पडताळून पाहाल.

ते तुम्हाला अटक करण्याची, तुमच्यावर खटला भरण्याची, तुमच्या ड्रायव्हिंग किंवा व्यवसायाचा परवाना काढून घेण्याची किंवा तुम्हाला हद्दपार करण्याची धमकी देऊ शकतात. ते कदाचित म्हणतील की तुमचा संगणक करप्ट होणार आहे.

4. घोटाळेबाज तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने पैसे देण्यास सांगतात

मनी ट्रान्सफर कंपनीद्वारे पैसे पाठवून किंवा गिफ्ट कार्डवर पैसे टाकून आणि नंतर त्यांना मागचा नंबर देऊन तुम्ही पैसे मिळवा, असा त्यांचा आग्रह असतो. काही जण तुम्हाला धनादेश पाठवतील (जे नंतर बनावट ठरतील), किंवा तुम्हाला ते आधी काही रक्कम जमा करण्यास सांगतील आणि नंतर पैसे पाठवण्याचं आमिष दाखवून लुबाडतील.

साभार – https://www.consumer.ftc.gov/

संबंधित बातम्या :

मुलींच्या नावाने सेक्शुअल चॅट, नंतर ब्लॅकमेलिंक करत लाखोंची मागणी, अशा नराधमांपासून सावध राहा

500 रुपयांचा थर्मास, पाच लाखांची लूट, ऑनलाईन शॉपिंग करताना नागपूरच्या ग्राहकाची फसवणूक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI