AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाई’ शब्दावरून राडा सुरू, पेटलं गँगवॉर, दोघांचा मृत्यू… कुठे घडला हा धक्कादायक प्रकार ?

गँगवॉरची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. दोन गटांमध्ये अवघ्या एक शब्दावरून सुरू झालेल्या या वादाला अतिशय हिंसक वळण लागले आणि त्याचा शेवट अतिशय दुर्दैवी झाला.

'भाई'  शब्दावरून राडा सुरू, पेटलं गँगवॉर, दोघांचा मृत्यू... कुठे घडला हा धक्कादायक प्रकार ?
| Updated on: Oct 10, 2023 | 12:18 PM
Share

नवी दिल्ली | 10 ऑक्टोबर 2023 : राजधानी दिल्लीत (delhi) रोज काही ना काही घडंतच असतं. कधी मोठी चोरी, दरोडा, तर कधी पिस्तुलाच्या धाकाने लूट.. गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे दिल्लीकर त्रस्त असतानाच आता राजधानीत आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. अवघ्या एका शब्दामुळे शहरातील काही तरूणांमध्ये वाद होऊन गँगवॉर (gangwar) पेटलं आणि त्यात दोघा जणांना हकनाक जीव गमवावा (2 people kileed) लागला.

दिल्लीतील अशोक विहारमध्ये गँगवॉर होऊन दोघांचा मृत्यू झाला तर गल्याने गोळी एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. तसेच यावेळी चाकूचे वार झाल्यावेही अनेक जखमी झाले. साध्या मुद्यावरून सुरू झालेला हा वाद बघता-बघता पेटला आणि त्याचे हिंसक गँगवॉरमध्ये रुपांतर झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

नावावरून झालेला वाद भलताच पेटला

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अशोक विहार मध्ये एक इसमाला त्याच्या नावाने हाक मारल्यामुळे दोन गटांत प्रथम वाद सुरू झाला आणि ते एकमेकांना शिवीगाळ करू लागले. बघता-बघता वाद बराच वाढला आणि दोन्ही पक्ष एकमेकांना मारहाण करू लागले. त्यानतंर दोन्ही गटांकडून गोळीबारही करण्यात आला. या गँगवॉरमध्ये दोघांची हत्या झाली तर बंदूकीची गोळी लागल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आदर देऊन बोलायचं नाहीतर… आणि सुरू झाला राडा

पोलिसांच्या सांगण्यानुसार, भलस्वा डेअरी परिसरात राहणारे रघू, झाकीर आणि भुरा हे सोमवारी रात्री अशोक नगर येथे डब्लू नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी आले होते. त्याचा शोध घेत होते, पण तो सापडत नव्हता. तेव्हा त्यांनी तेथील एका स्थानिक इसमाला विचारले की डब्ल्यू कुठे राहतो ? मात्र त्याने सरळ उत्तर दिले नाही. उलट ‘ डब्लू नाही, डब्लू भाई म्हणायचं’, असं त्यांनाच सुनावलं.

याच मुद्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. काही वेळाने डब्लू हा देखील तिथे आला. दोन्ही पक्षांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. त्याच दरम्यान, रघूने डब्लूला गोळी घातली. हे पाहून डब्लूच्या साथीदारांनी रघूला गोळ्या घातल्या. यात रघूचा जागीच मृत्यू झाला. या गँगवॉरदरम्यान रघूचे दोन साथीदार घटनास्थळावरून पळून गेले.

मात्र काही अंतरावर गेल्यावर रघूचा एक साथीदार भुरा पकडला गेला आणि डब्लूच्या साथीदारांनी त्याची हत्या केली. तर, घटनास्थळावरून पळून गेलेला रघूचा साथीदार झाकीर याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत जखमी झालेला डब्लूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान