Dombivli Crime : चिमुकल्याला घेऊन मैत्रिणीच्या लग्नासाठी माहेरी आली अन् क्षणात पोरकं करून गेली…

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुपसार, ज्योती ही मैत्रिणीच्या लग्न कार्यासाठी बंगळुरू येथून ती ठाकुर्लीत माहेरी आली होती. ज्योतीचं सुमारे 8 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि तिला साधारण 14 महिन्यांचं बाळंही आहे.

Dombivli Crime : चिमुकल्याला घेऊन मैत्रिणीच्या लग्नासाठी माहेरी आली अन् क्षणात पोरकं करून गेली...
क्राईम न्यूज
| Updated on: May 06, 2025 | 10:20 AM

मुंबईपासून अवघ्या काही अतंरावर असलेल्या डोंबिवलीमध्ये एक भयानक घटना घडली आहे. डोंबिवलीच्या ठाकुर्ली चोळेगाव परिसरात माहेरी आलेल्या एका विवाहीत महिलेने गळफास लावून घेत स्वत:चं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी रात्री हा दुर्दैवी प्रकार घडला असून त्या महिलेला 14 महिन्यांचं बाळंही आहे. आपल्या लाडक्या मुलाला एकटं टाकून विवाहीत महिलेने हे टोकाचं पाऊल उचलल्याने आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्योती विनोदकुमार चौहान (वय 30) असे मृत महिलेचे नाव असून तिच्या या कृत्यामुळे तिचं बाळ तर पोरकं झालंचय पण तिच्या कुटुंबियांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रामनगर पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती विनोदकुमार चौहान (वय 30) ही ठाकुर्लीतील चोळेगावातील तिच्या माहेरी आली होती. अविनाश निवास येथे वास्तव्य होतं. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुपसार, ज्योती ही मैत्रिणीच्या लग्न कार्यासाठी बंगळुरू येथून ती ठाकुर्लीत आली होती. ज्योतीचं सुमारे 8 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि तिला साधारण 14 महिन्यांचं बाळंही आहे. त्यात बाळासोबत ती माहेरी आली.

मात्र रविवार 4 मे रोजी तिने माहेरच्या घरातच टोकाचं पाऊलं उचललं. आपल्या 14 महिन्यांच्या बाळाला पोरकं केलं. राहत्या घरात तिने सिलींगच्या हुकला दोरी बांधून स्वत:ला गळफास लावून घेतला आणि आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती मिळताच कुटुंब शोकाकुल झाले, त्या लहना बाळाचं आता काय होणार याची चिंता सर्वांनाच सतावते आहे. ज्योतीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. रामनगर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मृतदेह दुचाकीवरून नेताना पकडलं आणि झाला खुनाचा उलगडा

पुण्यात एक गुन्हा उघडकीस आला असून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचं समोर आलं आहे.  राकेश रामनायक निसार असे आरोपी पतीचे नाव आहे. तर त्याने बबिता राकेश निशार असे मृत महिलेचे नाव आहे. राकेशने बबिताचा खून केला आणि रात्री दीडच्या सुमारास तो तिचा मृतदेह दुचाकीवरून घेऊन जात होता, तेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं. नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

राकेश बायकोची बॉडी घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसानी त्याला पकडले. मात्र राकेशने पत्नीचा खून नेमका का केला याचा कारण समजू शकले नाही. नांदेड सिटी पोलिस अधिक तपास पोलिस करत आहेत.