
सोलापूरचे न्यूरो फिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळे-माने यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आहे. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडून आरोपी मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात आणखी 27 तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली आहे.
दिवंगत न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या रुग्णालयातील मनीषा मुसळे- माने यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी २७ तक्रारी दाखल केल्या आहेत. या सर्व तक्रारींची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची वेळ ३ दिवसांनी वाढवून मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपीच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.
सरकारी पक्षाचे वकीलांनी कोर्टात मांडलेले दहा मुद्दे मांडले होते ते आम्ही खोडून काढले आहेत. दहा पैकी आठ मुद्दे या अगोदरचा रिमांड रिपोर्टमध्ये मांडण्यात आले होते. 27 कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली असल्या तरी कस्टडीची गरजच काय आहे ? 27 कर्मचारी म्हणजे सध्या ते हॉस्पिटलमध्ये काम करतायेत ते निश्चित मालकाचेच ऐकणार असेही आरोपीचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी बाजू मांडताना सांगितले.
त्यांचे काय स्टेटमेंट यायचे ते येऊ दे कोर्टात चार्जशीट आल्यानंतर आम्ही ते खोडून काढू असे आरोपीच्या वकीलांनी म्हटले आहे. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. जे दहा मुद्दे मांडलेले होते त्यांना कस्टडीची गरजच नव्हती. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत घ्यावे अशी विनंती केली होती असेही आरोपीचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी म्हटले आहे.