डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्ये मागे गृहकलहच..सूनेनेच दिली होती ही धमकी.?
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात फिर्यादीचे जबाब आणि आरोपी मनिषा मुसळे - माने यांच्या आतापर्यंत झालेल्या चौकशीतील माहिती आता समोर आली आहे. या घटनेत सुनेकडेच संशयाची सुई वळत आहे.

सोलापूरतील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने यांना अटकही झाली आहे. सोमवारी पोलिसांनी डॉक्टरांची सून शोनल वळसंगकर यांची देखील चौकशी केली होती. त्याआधी डॉक्टरांचे चिरंजीव डॉ. अश्विन यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यामुळे डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्ये मागे नेमके कोण जबाबदार आहे.याकडे लक्ष लागले असतान त्यांच्या सूनेसंदर्भात नवीन माहीती हाती आली आहे.
सोलापुरातील न्यूरो फिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मुलगा डॉ. आश्विन आणि सून डॉ. सोनाली यांचे जबाब काल पोलिसांनी घेतले आहेत. डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांच्या देखील जबाब पोलिस नोंदवणार आहेत. तर आरोपी मनीषा मुसळे – माने यांची देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही वर्षांपूर्वीच आपल्या हॉस्पिटलची संपूर्ण सूत्रं मुलगा डॉ. आश्विन आणि सून सोनाली यांच्याकडे सोपवली होती. तर हॉस्पिटलमधील संपूर्ण कारभार प्रशासकीय अधिकारी म्हणून आरोपी मनीषा मुसळे-माने याच पाहात होत्या असे माहिती उघडकीस आली होती. परंतू त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले होते.
आर्थिक गैरव्यवहारच्या तक्रारी
हॉस्पिटलच्या रुग्णांचे उपचार आणि प्रशासकीय कारभार यामुळे मुलगा डॉ.आश्विन आणि डॉ. सोनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण वाढलेला होता. त्यामुळे जानेवारी 2025 मध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलची सूत्रं स्वतःकडे घेतली. तेव्हा प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे – माने यांच्या विरोधात काही आर्थिक गैरव्यवहारच्या तक्रारी देखील डॉ. वळसंगकर यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे डॉ. वळसंगकर यांनी मनीषा मुसळे-माने यांचे अधिकार कमी केले होते. याच कारणामुळे मनीषा मुसळे – माने यांनी डॉ. वळसंगकर यांच्याशी वाद घातला होता.
मनिषा यांनी धमकी दिली होती…
शिवाय ई-मेल लिहीत मनिषा यांनी स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली अशी होती अशी माहीती उघड झाली आहे..शिवाय काही महिन्यांपूर्वी डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्स बद्दलदेखील चर्चा झाली होती. त्यानुसार डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही महिन्यांपूर्वीच संपत्तीची वाटणी कशी असावी याबाबत सविस्तर मृत्यूपत्र देखील तयार केले होते अशीही माहिती उघड झाली आहे.
