डॉ. वळसंगकर प्रकरणात पोलिसांना ‘तो’ क्लू सापडेना, मनिषा मानेला पुन्हा हॉस्पिटलमध्ये का नेलं?

Dr Shirish valsangkar Suicide Case : सोलापुरातील प्रख्यात न्यूरो फिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. स्वत:ला गोळी झाडून त्यांनी आयुष्य संपवलं होतं.

डॉ. वळसंगकर प्रकरणात पोलिसांना तो क्लू सापडेना, मनिषा मानेला पुन्हा हॉस्पिटलमध्ये का नेलं?
dr shirish valsangkar Suicide Case manisha mane
| Updated on: Apr 24, 2025 | 8:54 PM

Dr Shirish valsangkar Suicide Case : सोलापुरातील प्रख्यात न्यूरो फिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. स्वत:ला गोळी झाडून त्यांनी आयुष्य संपवलं होतं. त्यांच्या आत्महत्येला मनीषा माने ही महिला जबाबदार असल्याचा आरोप आहे. सध्या ही महिला पोलिसांच्या ताब्यात असून तिला आज पोलीस (24 एप्रिल) वळसंगकरांच्या रुग्णालयात घेऊन गेले होते. तिला रुग्णालयात नेताच तिथे अजब प्रकार पाहायला मिळाला. तिथल्या कर्मचाऱ्यांनी मनिषा मानेला पाहून प्रचंड संताप व्यक्त केला.

कर्मचाऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आज पोलीस आरोपी मनिषा माने हिला डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. मनिषा मानेला तिथे नेल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. चौकशीच्या कारणास्तव आरोपी मनीषा मानेला वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. यावेळी आरोपी मनीषा माने हिने डॉ. वळसंगकर यांना जो धमकीचा मेल पाठवला होता, त्याची प्रिंटेड कॉपी कोणत्या ठिकाणी फाडून टाकली, याचा शोध घेण्यात आला. त्यासाठी मनिषाला रुग्णालयात आणले होते.

मनीषा माने हिच्या घाणेरड्या आणि खोटारड्या आरोपामुळे…

यावेळी हॉस्पिटलमधील विविध सिस्टमचे पासवर्ड मनीषा मानेकडून रिकव्हर करण्यात आल्याची माहिती आहे. डॉ. वळसंगकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये मनीषा माने हिच्या घाणेरड्या आणि खोटारड्या आरोपामुळे मी जीवन संपवत आहे, असा उल्लेख केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे आरोपी मनीषा मानेविरोधात हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचा रोष आहे. हाच रोष आज मनिषा माने हिला रुग्णालयात आणल्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.