कर्ज फेडण्यासाठी लढवली शक्कल, पण मार्ग चुकीचा असल्यानं उडाली खळबळ, काय घडलं?

| Updated on: Mar 21, 2023 | 3:23 PM

पेशाने चालक असलेल्या व्यक्तीने मोठ्या थाटामाटात मुलाचे लग्न केले. पण या दिखाव्याच्या नादात तो कर्जबाजारी झाला. मग कर्ज फेडण्यासाठी त्याने एक शक्कल लढवली आणि हीच शक्क्ल त्याला थेट तुरुंगात घेऊन गेली.

कर्ज फेडण्यासाठी लढवली शक्कल, पण मार्ग चुकीचा असल्यानं उडाली खळबळ, काय घडलं?
कर्ज फेडण्यासाठी मालकाचे पैसे चोरले
Image Credit source: tv9
Follow us on

इंदूर : मुलाच्या लग्नामुळे कर्जबाजारी झालेल्या पित्याने कर्ज फेडण्यासाठी एक शक्कल लढवली. पण ही शक्कल त्याला महागात पडली आणि त्याची थेट तुरुंगात रवानगी झाली. मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील बाणगंगा परिसरात ही धक्कादायक घडली आहे. राजेंद्र पंडित असे आरोपीचे नाव असून, तो पेशाने चालक आहे. राजेंद्रच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले. या लग्नामुळे तो कर्जबाजारी झाला. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने मालकाचे 4 लाख रुपये चोरले. मात्र सीसीटीव्हीमुळे तो पकडला गेला. मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मुलाच्या लग्नामुळे कर्जबाजारी झाला

आरोपीने फेब्रुवारी महिन्यात आपल्या मुलाचे लग्न लावून केले होते. त्यामुळे त्याच्यावर चार ते पाच लाखांचे कर्ज झाले होते. त्यामुळे तो खूप अस्वस्थ होता. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने मालकाचे पैसे चोरले होते. मालकाने आपल्या वैयक्तिक खात्यातून 4 लाख रुपये काढून गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते. हे पैसे राजेंद्रने चोरले.

सीसीटीव्हीमुळे आरोपी अटक

गाडीतून पैसे गायब झाल्याचे लक्षात येताच मालकाने राजेंद्रला हरवलेल्या पैशांबाबत विचारणा केली. मात्र राजेंद्रने पैशांबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. यानंतर मालकाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीची ओळख पटली. पोलिसांनी आरोपी राजेंद्र पंडित याला अटक करून चोरीची रक्कम जप्त केली.

हे सुद्धा वाचा