वडीलांवर केले सुनेशी संबंधाचे आरोप, नंतर दिली क्लीन चीट, पंजाबच्या Ex DGP च्या मुलाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात ट्वीस्ट

पंजाबचे माजी पोलिस महासंचालक मोहम्मद मुस्तफा यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियावर आरोप करणारे मुलाचे व्हिडीओ बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. एका व्हिडीओत वडीलांचे आपल्या पत्नी अनैतिक संबंध असल्याचा आरोप मुस्तफा यांचा मुलगा अकील याने केले होते.

वडीलांवर केले सुनेशी संबंधाचे आरोप, नंतर दिली क्लीन चीट, पंजाबच्या Ex DGP च्या मुलाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात ट्वीस्ट
| Updated on: Oct 21, 2025 | 8:15 PM

पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांचा मुलगा अकील अख्तर याने वडिलांवर सूनेशी अनैतिक संबंधाचे आरोप व्हिडीओतून केले होते. त्याने त्याची आई रजिया सुल्ताना आणि बहिण निशात अख्तर यांच्या सह संपूर्ण कुटुंब आपल्याला ठार मारण्याचा कट रचत असून खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. आता त्याचा दुसरा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात त्याने कुटुंबाल क्लीन चीट दिली आहे. अशा दोन्ही प्रकारचे विरोधाभासी व्हिडीओ पुढे आल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.

पंजाबचे माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांचा मुलगा अकील अख्तर याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर दोन विरोधाभासी व्हिडीओ समोर आल्यानंतर हा तपास आणखीनच जटील झाला आहे. एकीकडे मुलगा अकील अख्तर याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर या कुटुंबाच्या चार सदस्यांवर हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचा एफआयआर दाखल झाला आहे. तर आता एक नवा व्हिडीओ आला असून त्यात तो कुटुंबाला क्लीन चीट देताना दिसत आहे.

आधी आलेल्या व्हिडीओत अकील यानी त्याचे वडील आणि त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याने दावा केला होता की त्याचे कुटुंब ( आई आणि बहिण ) त्याची हत्या करणे किंवा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचा आणि त्याने डाईंग डिक्लरेशनचा उल्लेख केला होता.

अकील याच्या तीन मिनिटांच्या दुसऱ्या व्हिडीओत त्याने आधी लावलेले सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. हे आरोप आपण तब्येत खराब असल्याच्या स्थितीत लावले होते. आणि आपले कुटुंब आपली योग्य काळजी घेत असल्याचे म्हटले आहे. अकील याच्या दुसऱ्या व्हिडीओ त्याने त्याची बहिण चांगली असून आपली काळजी घेत असल्याचे म्हटले आहे.

हरयाणा येथील पंचकुला पोलिसांनी माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा, त्यांची पत्नी माजी मंत्री रजिया सुल्ताना, त्याची मुलगी आणि सून यांच्यासह चार जणांवर एफआयआर दाखल करण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

येथे पोस्ट पाहा –

डीसीपी सृष्टी गुप्ता यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांचा मुलगा अकील याचा मृत्यू १६ ऑक्टोबर रोजी झाला होता. त्याच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली होती. त्यावेळी कुटुंबाने कोणताही संशय नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे पोस्ट मार्टेम झाल्यानंतर अकीलचा मृतदेह कुटुंबियांच्या सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या पक्षाने आपली तक्रार करत दावा केला की अकील अख्तर याने सोशल मीडियावर अकील अख्तर याने काही व्हिडीओ आणि कंटेन्ट पोस्ट केला होता.

येथे पाहा पोस्ट –


पोलिस आता या वेगवेगळ्या आरोपामागचे सत्य शोधण्यासाठी तपास करत आहे. दोन्ही व्हिडीओ आता या प्रकरणातील तपासासाठी मुख्य साक्ष बनले आहेत.