ट्रेन सुरु झाल्याने प्रवाशाने समोसे घेण्यास नकार दिला, तर वेंडरने पकडली कॉलर-घड्याळ गहाण ठेवायला भाग पाडले Video Viral
रेल्वेच्या प्रवासात प्रवाशांना अनेकदा दामदुप्पट दराने निकृष्ट पदार्थ विकल्याचे प्रकार घडत असतात. एका प्रकरणात तर आता वेंडरने प्रवाशाला समोसे घेण्यावरुन घड्याळ गहाण ठेवायला सांगितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

रेल्वे प्रवासात अनेकदा प्रवाशांना फेरीवाले आणि कँटीन चालकाच्या दादागिरीचा सामना करावा लागत असतो. असाच एक प्रकार घडला आहे.यात प्रवासी रेल्वेतून उतरुन समोसा घेत होता. त्याने मोबाईलने पेमेंट करण्याचा प्रयत्न केला. परंतू पेमेंट फेल झाले. त्यानंतर गाडी सुट लागल्याने त्याने समोसा परत करण्याचा प्रयत्न केला तर वेंडरने त्याची कॉलर पकडून त्याच्याकडून घड्याळ गहाण ठेवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
रेल्वे स्थानकच नाही तर बाजारात देखील असे प्रकार पाहायला मिळत आहेत. ज्यात विक्रेता दुकानादाराकडील प्रोडक्टची विचारणा करण्यास आलेल्या ग्राहकावर जर त्याने ते प्रोडक्ट विकत घेतले नाही तर खेकसतो.आणि उद्धटपणे शिवीगाळ करतो. आपला वेळ खराब केल्याचा आरोप करता. आणि सामान विकत घेण्यास भाग पाडतो. असाच प्रकार मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडला आहे.
मध्य प्रदेशाच्या जबलपूर रेल्वे स्थानकातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका वेंडरने मनमानी करत प्रवाशाची कॉलरच पकडली नाही तर त्याच्याशी उद्धटपणे वागणूक करत त्याचे घड्याळ गहान ठेवून घेतले. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला तर याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून वेंडरवर देखील कारवाई केली गेली आहे. काय हे प्रकरण पाहूयात…
जेव्हा व्हिडीओची चौकशी झाली तेव्हा कळले की हा व्हिडीओ १७ ऑक्टोबरचा आहे. एक प्रवासी ट्रेनमधून उतरुन समोसे मागितले. त्याला फोनने पेमेंट करायचे होते, परंतू पेमेंट झाले नाही. त्याच वेळी ट्रेन सुटु लागल्याने त्याने समोसा परत केला. आणि ट्रेन पकडण्यासाठी पुढे गेला असताना वेंडरने त्याची कॉलर पकडून आणि समोसा घेण्यास मजबूर केले गेले.ट्रेन सुटण्याची भीतीने प्रवाशाने पैसे देऊ न शकल्याने स्वत:चे घड्याळ गहाण ठेवले. त्यानंतरच त्याला ट्रेन कशी बशी पकडता आली.
येथे पाहा व्हिडीओ –
ये वेंडर है या रेलवे स्टेशन का गुंडा? श्रीमान @AshwiniVaishnaw जी एवं @RailMinIndia इस तरह के गुंडों पर लगाम कब लगेगी?
लोग अपने घर परिवार से दूर सैकड़ों हजारों किलोमीटर का सफर रेलवे से करते है। क्या भारतीय रेलवे यात्रियों के सुरक्षा की जिम्मेदारी भी नहीं ले सकता?
इंसानियत को… pic.twitter.com/3A4r6nFfSy
— NCIB Headquarters (@NCIBHQ) October 19, 2025
वेंडरने कॉलर का पकडली
विक्रेत्याने आरोप केला की प्रवाशाने समोशाच्या भाव विचारला.चौकशी केली पण विकत घेतला नाही. आपला वेळ वाया घालवला. परंतू वेंडरच्या या कृत्यावर सोशल मीडियावर खूपच टीका टीप्पणी होत आहे. या दरम्यान, आरपीएफने या प्रकरणात वेंडर विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. डीआरएमना जबलपुरना त्याचे लायसन्स रद्द करण्याचे आदेश दिले आहे.
