मुलाच्या हत्येसाठी 75 लाखांची सुपारी, वडील लेकाच्या जीवावर का उठले ?

संपत्तीसाठी लोकं आपल्याचं लोकांचाही विश्वासघात करून त्यांच्या जीवावर उठू शकतात. पुण्यातही असाच एक प्रकार घडला असून स्वत:च्या मुलेच्या हत्येसाठी सुपारी देणाऱ्या नराधम पित्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

मुलाच्या हत्येसाठी 75 लाखांची सुपारी, वडील लेकाच्या जीवावर का उठले ?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 11:32 AM

प्रॉप्रर्टी, संपत्तीसाठी लोकं आपल्याचं लोकांचाही विश्वासघात करून त्यांच्या जीवावर उठू शकतात. पुण्यातही असाच एक प्रकार घडला असून स्वत:च्या मुलेच्या हत्येसाठी सुपारी देणाऱ्या नराधम पित्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आठवड्याभरापूर्वी पुण्यातील जंगली महाराज रोडवर भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकावर पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी 6 जणांना अटक करून या घटनेचा खुलासा केला आहे. एका इसमाने त्याच्याच मुलाला मारण्यासाठी 75 लाखांची सुपारी दिली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 6 जणांना अटक करून या घटनेचा खुलासा केला आहे. संपत्तीवरून सुरू असलेल्या वादावरूनच एका पित्याने हे पाऊल उचलले आणि तो मुलाच्या जीवावर उठला.

मुलाच्या मनमानी कारभारामुळे वैतागले होते वडील

याप्रकरणी वडील दिनेशचंद्र अरगडे, प्रशांत घाडगे, अशोक ठोंबरे, प्रवीण कुडले, योगेश जाधव, चेतन पोकळे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी वडील दिनेशचंद्र हे त्यांचा मुलगा धीरज अरगडे याच्या मनमानी वागणुकीमुळे नाराज होते. त्याच्या या वागण्याच्या त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत होता. एवढंच नव्हे तर कौटुंबिक कारण आणि मालमत्तेच्या वादामुळेही पिता-पुत्राच्या नात्यात तणाव वाढला होता.

हल्लोखोरांनी बंदूक तर चालवली पण…

हत्येच्या प्रयत्नानंतर फिर्यादी धीरज अरगडे यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. 16 एप्रिल रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास ते जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स बिल्डिंगजवळ असताना हा हल्ला झाला. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी धीरज यांच्यासमोर पिस्तुल ताणले आणि गोळीबारही केला. पण ती गोळी पिस्तुलामध्येच अडकली अन् धीरज यांचा जीव वाचला.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी केला गुन्ह्याचा उलगडा

याप्रकरणी धीरज यांनी तक्रार दाखल केल्यानंतर क्राइन ब्रांचच्या टीमने कसून तपास सुरू केला. त्यादरम्यान पोलिसांनी परिसरातील आणि बिल्डींगजवळील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच धीरज अरगडे आणि सर्व नातेवाईकांची कसून चौकशी देखील पोलिसांकडून करण्यात आली. धीरज आणि त्यांचे वडील दिनेशचंद्र अरगडे यांच्याच कौटुंबिक कारण आणि संपत्तीच्या मुद्यावरून वाद सुरू होते, याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यासंदर्भात अधिक तपास केल्यावर धीरज यांच्या हल्ल्यामागे त्यांच्या वडीलांचाच हात असल्याचे धक्कादायक सत्य समोर आलं. तरजची हत्या करण्यासाठी त्यांचे वडील दिनेशचंद्र यांनी हल्लेखोरांना तब्बल 75 लाख रुपयांची सुपारी दिली. याप्रकरणी पोलिसांनी दिनेशचंद्र अरगडे यांच्यासह 6 लोकांना अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.