शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द, प्रकृती अस्वस्थपणामुळे डॉक्टरांचा आराम करण्याच्या सूचना

शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार यांचे कुटुंबिय श्रीनिवास पवार, रणजित पवार यांनी शरद पवार यांची मोदी बागेत जावून भेट घेतली आहे.

शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द, प्रकृती अस्वस्थपणामुळे डॉक्टरांचा आराम करण्याच्या सूचना
शरद पवार
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 5:55 PM

राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारासाठी जात आहेत. शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या पक्षाच्या अनेक उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार गटाची काल सभा पार पडली. या सभेतही शरद पवार पूर्णवेळ उपस्थित होते. तसेच शरद पवार यांनी या सभेत भाषणही केलं. शरद पवार हे सातत्याने प्रचारसभांमध्ये भाषण करत आहेत. विशेष म्हणजे राज्यात सध्या उन्हाचा कडाका आहे. या उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता आहे. असं असताना शरद पवार हे स्वत: प्रचारसभांमधून संबोधित करत होते. त्यामुळे उन्हाचा आणि धावपळीचा फटका शरद पवार यांना बसला आहे. शरद पवार यांना अस्वस्थ वाटत आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार यांचे कुटुंबिय श्रीनिवास पवार, रणजित पवार यांनी शरद पवार यांची मोदी बागेत जावून भेट घेतली आहे. बारामतीत उद्या मतदान आहे. शरद पवार कुटुंबियांकडून सदस्यांकडून यंत्रणेचा आढावा घेत आहेत. शरद पवार यांना डॉक्टरांनी दोन दिवस भाषण करु नका, असा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता कुटुंबिय शरद पवार यांची काळजी घेत आहेत. तसेच आता मतदान आहे. त्यामुळे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असला तरी शरद पवार मतदानाचा आढावा आपल्या कुटुंबियांकडून घेत आहेत.

शरद पवार आजारी असताना कामात सक्रिय

शरद पवार यांची प्रकृती बरी नाही. पण तरीही ते कामात व्यस्त आहेत. ते घरातून आपल्या कुटुंबियांकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शरद पवार यांना डॉक्टरांनी आराम करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी ते कामाला जास्त महत्त्व देत आहेत. बारामतीत उद्या मतदान आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाधिकारी आणि कुटुंबियांना तसेच विश्वासातील व्यक्तींना महत्त्वाच्या जबबादाऱ्या दिल्या आहेत. त्या माध्यमातून ते संबंधित व्यक्तींकडून कामाचा आढावा देखील घेत असल्याची माहिती मिळत आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.