AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळूमामांच्या आठवणीतला नवा अवतार; न पाहिलेली कथा उलगडणार

कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणारी 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या पाच वर्षांपासून या मालिकेवर प्रेक्षकांकडून प्रेमाचा वर्षाव होतोय. आता या मालिकेत प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेली कथा उलगडणार आहे.

बाळूमामांच्या आठवणीतला नवा अवतार; न पाहिलेली कथा उलगडणार
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मध्ये उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेल्या कथा Image Credit source: Instagram
| Updated on: May 19, 2024 | 10:19 AM
Share

गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’. 2018 मध्ये ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर बाळूमामांच्या जीवनावर आधारित असलेली ही मालिका सुरू झाली होती. खूप कमी कालावधीत ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या लोकप्रिय मालिकेत आजवर प्रेक्षकांनी बाळूमामांना वेगवेगळ्या रूपात पाहिलं आहे. रसिकांनी बाळूमामांचं लहान वयातील रूप आणि तरूण वयातील रूप पाहिलं आणि त्यांच्या उतारवयाच्या टप्प्यावरचे रूपही अनुभवले. या सर्व रूपात प्रेक्षकांनी बाळूमामावर भरभरून प्रेमही केलं आहे. आता प्रेक्षकांना बाळूमामांच्या आयुष्याच्या आठवणीतील आणि भूतकाळातील अशा काही गोष्टी बघायला मिळणार आहेत, ज्या आत्तापर्यंत कोणालाच माहीत नव्हत्या.

उतारवयाच्या या टप्प्यावर बाळूमामांना जाणीव व्हायला लागली की, आपण एवढा प्रवास केला, लोकांसाठी राबलो, आयुष्यात अनेक लोकं आली आणि गेली. आता आपण एकटे पडलो आणि या सगळ्या आठवणींनीमुळे मामा रडायला लागले. मामांचे गुरु मुळे महाराज त्यांनी भेटून त्यांचं सांत्वन केलं आणि मग त्या दोघांचा एकत्र प्रवास सुरु होतो. प्रवास करत असताना अक्कोळ गावाजवळ ते आले. त्यांना काही माणसे भेटली आणि गावात येण्याची विनंती केली. त्यानंतर मामांना इथून पुढे भूतकाळाचे काही प्रसंग दिसू लागतात. भूतकाळामध्ये गेल्यावर त्यांना छोट्या मामांच्या आयुष्यातील पुढची कथा उलगडायला सुरु होते. चंदूलालचा लोभीपणा, आईचा खाष्टपणा आणि प्रेमळ बायकोची मामावर असलेली माया आपल्याला पाहायला मिळेल.

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

मामांच्या अशा अनेक चमत्कारिक प्रसंगाची मालिका सुरू होणार असून ती लवकरच प्रेक्षकांसमोर नव्या रूपाने सादर होणार आहे. बाळूमामांच्या चरित्रगाथेत या कथेच्या निमित्ताने समर्थ पाटील ज्याने बालपर्वातील बाळूमामाची लोकप्रिय भूमिका साकारली होती, तो मालिकेमध्ये पुनरागमन करणार आहे. अष्टपैलू अभिनेते प्रकाश धोत्रे बाळूमामांची मुख्य भूमिका साकारत आहेत. या नव्या टप्प्यावर सुद्धा बाळूमामांच्या अनाकलनीय आणि अवाक करणाऱ्या चरित्रातील अनेक न पाहिलेले प्रसंग प्रेक्षकांना पहायला मिळतील. येत्या 20 मे पासून ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.