AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cannes Festival मधून परत येताच ऐश्वर्या राय करणार सर्जरी, मोठी माहिती समोर

Aishwarya Rai Bachchan | कान फिल्म फेस्टिव्हल मधून परत भारतात येताच ऐश्वर्या राय करणार सर्जरी... कशी आहे अभिनेत्रीची प्रकृती? कान फिल्म फेस्टिव्हलमधील अभिनेत्रीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल, ऐश्वर्यासोबत होती आराध्या बच्चन

Cannes Festival मधून परत येताच ऐश्वर्या राय करणार सर्जरी, मोठी माहिती समोर
| Updated on: May 19, 2024 | 10:29 AM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये व्यस्त आहे. 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत हजेरी लावली आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, ऐश्वर्या हिच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलहून परत येताच ऐश्वर्या हिच्यावर सर्जरी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. फेस्टिवलला जाण्यापूर्वी अभिनेत्रीच्या हाताला दुखापत झाली होती.

जेव्हा ऐश्वर्या हिला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं, तेव्हा अभिनेत्रीच्या हाताला झालेली दुखापत कॅमेऱ्यात कैद झाली. रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या हिच्या हाताला दुखापत झाली होती. ज्यामुळे अभिनेत्रीच्या हाताला प्लास्टर करण्यात आलं. पण कान्स फिल्म फेस्टिव्हलला जाण्याची परंपरा मोडली नाही. डॉक्टरांचा सल्ला घेऊन अभिनेत्री कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी गेली. मुंबईत परतल्यानंतर अभिनेत्रीच्या हाताची सर्जरी होणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आराध्या बच्चन हिच्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते. सांगायचं झालं तर, कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये आराध्या हिचा नवा लूक चाहत्यांना पाहाता आला. शिवाय सोहळ्या दरम्यान, आई ऐश्वार्या हिची काळजी देखील घेताना दिसली.

ऐश्वर्या राय दरवर्षी कान फिल्म फेस्टिव्हलला आवर्जून हजेरी लावते. या फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याचा रेड कार्पेट लूक लक्षवेधी ठरतो. संपूर्ण जगभरात तिच्या अनोख्या लूक्सची चर्चा होते. पण आता अभिनेत्रीच्या हाताला असलेल्या प्लास्टरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

बच्चन कुटुंबाची लेक असल्यामुळे आराध्या कायम चर्चेत असते, सोशल मीडियावर देखील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. खुद्द ऐश्वर्या देखील आराध्या हिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ऐश्वर्या आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसते. पण अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.