नवऱ्याचा स्पर्म काऊंट कमी म्हणून सुनेला गर्भवती करण्यासाठी सासरा आणि…मूळापासून हादरवून सोडणारं प्रकरण काय?

घरच्यांना नातू हवा आहे. त्यामुळे तू तुझं तोंड बंद ठेव. कुठे काही बोलू नकोस. तू या बद्दल कोणाला बोललीस तर तुझे न्यूड फोटो व्हायरल करीन, अशी धमकी नवऱ्याने दिली.

नवऱ्याचा स्पर्म काऊंट कमी म्हणून सुनेला गर्भवती करण्यासाठी सासरा आणि...मूळापासून हादरवून सोडणारं प्रकरण काय?
rape
| Updated on: Aug 12, 2025 | 3:02 PM

लग्नानंतर प्रत्येक जोडप्याचं एक प्लानिंग असतं. काही जोडप्यांना बाळ लवकर हवं असतं, तर काहींना उशिरा. अनेक घरात बाळ लवकर हवं, असा कुटुंबियांचा दबाव असतो. काही जोडप्यांच्या बाबतीत प्रयत्न करुनही पत्नीला लवकर गर्भधारणा होत नाही. त्यावेळी डॉक्टरांच्या मदतीने उपचार घेतले जातात. पण गुजरातच्या वडोदरामध्ये एका कुटुंबात वैद्यकीय उपचारांऐवजी अत्यंत विचित्र प्रकार घडत होता. ही प्रकार मूळापासून हादरवून सोडणारा आहे. नवऱ्याचा स्पर्म काऊंट कमी म्हणून एका महिलेवर तिच्या सासऱ्याने अणि नणदेच्या नवऱ्याने वारंवार बलात्कार केला. हे सर्व तिला गर्भवती करण्यासाठी सुरु होते.

यातून महिला गर्भवती राहिलेली. पण तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिने नवापुरा पोलीस स्टेशन गाठून सासरे आणि नणदेच्या नवऱ्याविरोधात बलात्कार आणि लैंगिक छळाची तक्रार नोंदवली. तिने नवऱ्यावर सुद्धा ब्लॅकमेलिंगचा आरोप केला. नवरा इंटिमेट फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन मला प्रत्येकवेळी गप्प बसावयाचा असं तिने म्हटलं. एफआयआरनुसार फेब्रुवारी 2024 मध्ये लग्न करुन ती नवऱ्याच्या घरी गेली. काही दिवसांनी सासू-सासरे तिला म्हणाले की, वयामुळे तुला गर्भधारणा होणार नाही. त्यातून तुम्ही फर्टीलिटीची ट्रीटमेंट घ्या.

रुममध्ये झोपलेली असताना सासरे तिथे आले

मेडिकल रिपोर्टमधून समोर आलं की, नवऱ्याचा स्पर्म काऊंट कमी आहे. त्यामुळे ती गर्भवती राहू शकत नाही. त्यानंतर तिने वैद्यकीय सल्ल्यानुसार IVF ने गर्भधारणेचा प्रयत्न केला. पण त्याचा फायदा झाला नाही. त्यानंतर तिने उपचार घेण्यास नकार दिला. त्याऐवजी मूल दत्तक घेण्याचा विचार तिने मांडला. पण सासू-सासरे तयार झाले नाहीत. जुलै 2024 मध्ये ती तिच्या रुममध्ये झोपलेली असताना सासरे तिथे आले. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. तिने आरडाओरडा करताच त्यांनी तिच्या कानाखाली मारली.

‘…तर तुझे न्यूड फोटो व्हायरल करीन’

ज्यावेळी तिने या बद्दल नवऱ्याला सांगितलं, तो म्हणाला की, घरच्यांना नातू हवा आहे. त्यामुळे तू तुझं तोंड बंद ठेव. कुठे काही बोलू नकोस. तू या बद्दल कोणाला बोललीस तर तुझे न्यूड फोटो व्हायरल करीन, अशी धमकी नवऱ्याने दिली. सासऱ्यांनी बऱ्याचदा माझ्यावर जबरदस्ती केली. पण मला गर्भधारणा झाला नाही.

नणदेच्या नवऱ्याकडून रेप

डिसेंबर 2024 मध्ये नणदेच्या नवऱ्याने माझ्यावर बलात्कार केला. त्याने सुद्धा बऱ्याचवेळा रेप केला. जून महिन्यात मला गर्भ राहिला. पण जुलै महिन्यात गर्भपात झाला. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात ती पोलिसांकडे गेली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर रविवारी FIR नोंदवला.