पित्याला आपल्या मुलाबद्दल वेगळीच चिंता सतावत होती, मग पित्याने जे केले त्याने सर्वच हादरले !

| Updated on: May 10, 2023 | 9:45 PM

आधीच हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेला मुलगा वडील आणि भावाकडे संपत्तीसाठी भांडत होता. वडिलांच्या मनात वेगळीच भीती होती. यातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.

पित्याला आपल्या मुलाबद्दल वेगळीच चिंता सतावत होती, मग पित्याने जे केले त्याने सर्वच हादरले !
संपत्तीच्या वादातून वडिलांनी मुलाला संपवले
Image Credit source: Google
Follow us on

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील दादरीजवळ एका धक्कदायक घटना घडली आहे. पित्यानेच आपल्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडात मयताचा भाऊ आणि अन्य दोन लोक सहभागी असल्याचीही माहिती मिळते. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून पित्याने ही हत्या केली. कपिल सिंह असे मयत मुलाचे नाव आहे. कपिल हा चुलत भावाच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगून आला होता. संपत्तीच्या वादातून आपली आणि दुसऱ्या मुलाचीही हत्या करेल अशी भीती पित्याला वाटत होती. यातूनच त्याने हत्या केली.

आपली आणि मुलाच्या हत्येची भीती पित्याच्या मनात होती

कपिलचा हत्येप्रकरणी शिक्षा भोगून आल्यानंतर वडील आणि भावासोबत संपत्तीवरुन वाद सुरु होता. तो संपत्तीत हिस्सा मागत होता. एप्रिलमध्ये पंचायतही घेण्यात आली होती. यानंतर त्याला वडिलोपार्जित संपत्तीत हिस्साही देण्यात आला होता. मात्र तरीही तो आपली आणि आपल्या दुसऱ्या मुलाची हत्या करु शकतो अशी भीती पित्याच्या मनात होती. यातूनच त्याने ही हत्या केली.

कपिल आपल्या आजोळी दुरियाई गावात मामाच्या घरी झोपला होता. यावेळी कारमधून चार लोक आले आणि त्यांनी कपिलवर गोळ्या झाडल्या. यानंतर चाकूहल्लाही केला. यात कपिलचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. रुकन सिंह असे पित्याचे नाव आहे.

हे सुद्धा वाचा

चुलत भावाच्या हत्येप्रकरणी 10 वर्षे तुरुंगात होता कपिल

वैयक्तिक वादातून 2012 मध्ये कपिलने आपल्या चुलत भावाची हत्या केली होती. याप्रकरणी कपिलच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा होत अटक झाली होती. बहाणा करुन भावाला सोबत घेऊन गेला आणि हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरला होता. दहा वर्षे कारावास भोगून कपिल तुरुंगातून बाहेर आला होता.