सेवा निवृत्त लष्करी जवानाकडून भर बाजारात हवेत गोळीबार, भीतीने नागरिकांची तारांबळ

| Updated on: Feb 17, 2023 | 9:26 AM

बदलापूर पश्चिमेत राहणारा विनेश विजय सुर्वे हा सेवा निवृत्त लष्करी जवान पलावा संकुल परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. बुधवारी रात्री काटई कोळेगाव येथील रस्त्याने तो जात असताना त्यांनी भर बाजारात आपल्या जवळील पिस्तुलमधून हवेत गोळीबार केला.

सेवा निवृत्त लष्करी जवानाकडून भर बाजारात हवेत गोळीबार, भीतीने नागरिकांची तारांबळ
बोलण्यास नकार दिल्याने तरुणीवर हल्ला
Image Credit source: TV9
Follow us on

डोंबिवली / सुनील जाधव (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त लष्करी जवानाने डोंबिवली जवळील कोळेगाव येथे भर बाजारात स्वतःच्या पिस्तुलमधून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. भर बाजारात गोळीबार झाल्याने बाजारात आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. गोळीबारानंतर भितीने नागरिकांची एकच धावपळ उडाली. एका जागरुक नागरिकाने मानपाडा पोलिसांनी घटनेची माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी तात्काळ बाजाराकडे धाव घेत निवृत्त जवानाला ताब्यात घेतले. विनेश विजय सुर्वे असे गोळीबार करणाऱ्या 41 वर्षीय निवृत्त लष्करी जवानाचे नाव असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

निवृत्त जवान पलावा संकुलात सुरक्षारक्षक म्हणून तैनात

बदलापूर पश्चिमेत राहणारा विनेश विजय सुर्वे हा सेवा निवृत्त लष्करी जवान पलावा संकुल परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. बुधवारी रात्री काटई कोळेगाव येथील रस्त्याने तो जात असताना त्यांनी भर बाजारात आपल्या जवळील पिस्तुलमधून हवेत गोळीबार केला.

गोळीबाराच्या घटनेने नागरिकांची तारांबळ

गोळीबार होताच कोळेगाव बाजारात असलेल्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. अनेक जण जीव वाचवण्यासाठी पळापळ करू लागले. पूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हे सुद्धा वाचा

मानपाडा पोलिसांकडून जवानावर गुन्हा दाखल

या प्रकरणी याच परिसरातील एका जागरुक नागरिकाने मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन विनेश यांना ताब्यात घेतले त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र विनेश यांनी गोळीबार कोणत्या कारणातून केला हे अद्याप कळू शकले नाही.