वनविभाग कर्मचाऱ्याचा मुलगाच निघाला तस्करीचा सूत्रधार, उच्चशिक्षित होता पण…

| Updated on: Sep 27, 2022 | 3:38 PM

नाशिकच्या कृषि नगर जॉगिंग ट्रॅक जवळ बिबट्याची कातडी, चिंकारा आणि निलगायीचे शिंगे अशा अवयवांची तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाने अटक केली होती.

वनविभाग कर्मचाऱ्याचा मुलगाच निघाला तस्करीचा सूत्रधार, उच्चशिक्षित होता पण...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) गेल्या आठवड्यात वन्य प्राण्यांची तस्करी करत असल्याच्या टोळीला रंगेहाथ पकडले होते. वनविभागाने (Forest Department) केलेल्या या कारवाईत तीन महाविद्यालयीन तरुणांचा (college Student) समावेश असल्याची माहिती समोर आली होती. कारवाईच्या दरम्यान या तिघांपैकी दोघांनी न्यायालयात (Court) जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाचे त्यांचा अर्ज फेटाळत तिघांना मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती. या तिन्ही संशयित आरोपींपैकी एक आरोपी हा वनविभागाच्या कर्मचाऱ्याचाच मुलगा असल्याचे समोर आले आहे. आणि तोच या टोळीचा सूत्रधार असल्याची बाब वनविभागाच्या निदर्शनास आली आहे.

नाशिकच्या कृषि नगर जॉगिंग ट्रॅक जवळ बिबट्याची कातडी, चिंकारा आणि निलगायीचे शिंगे अशा अवयवांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक केली होती.

यामध्ये सिद्धांत पाटील, रोहित आव्हाड आणि जॉन लोखंडे या तिघांचा समावेश होता. त्यात जॉन लोखंडे हा वनविभागात चौकीदार असलेल्या कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.

वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे यांच्यासह पथकाने केलेल्या या कारवाईत या तिघांना अटक केली होती. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तपासादरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याची कातडी कुठून आणली अशी माहिती विचारतांना आपल्याच विभागातून चोरल्याची जॉन लोखंडे याने दिली होती.

दरम्यान वनविभागाच्या अशी कुठलीही कातडी नसल्याचे प्रत्युत्तर देताच अनोळखी व्यक्तीने दिल्याची कबुली उर्वरित संशयितांनी दिली आहे.

एकूणच तपासात विसंगतीचे उत्तरे मिळाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आता अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू केला असून कारवाईला वेग दिला आहे.

या कारवाई दरम्यान अंधश्रद्धेपोटी ही तस्करी होत असल्याची माहिती समोर आली असून वनविभागाच्या वतीने याबाबत विशेष आवाहन करण्यात येत आहे.

वन्य प्राण्यांच्या अवयवांनी कोणीही सखी, समृद्धी आणि श्रीमंत होत नाही त्यामुळे त्यास बळी पडू नका अन्यथा कारवाई होईल असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.