वाढदिवशीच पेट्रोल टाकून जिवंत जाळले, धारुर घाटात अर्धवट जळालेला तरुण पाहून खळबळ, बीड हादरलं

वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने अंगावर पेट्रोल टाकून तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ही धक्कादायक घटना धारुर घाटात घडली असून होरपळलेल्या तरुणाचे नाव कृष्णा गायकवाड असे आहे. अगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्यामुळे तरुण गंभीर जखमी झालाय.

वाढदिवशीच पेट्रोल टाकून जिवंत जाळले, धारुर घाटात अर्धवट जळालेला तरुण पाहून खळबळ, बीड हादरलं
BEED CRIME
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 6:07 PM

बीड : वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने अंगावर पेट्रोल टाकून तरुणाला जिवंत जाळण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय. ही धक्कादायक घटना धारुर घाटात घडली असून अर्धवट जळालेल्या तरुणाचे नाव कृष्णा गायकवाड असे आहे. अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्यामुळे तरुणाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर या घटनेतील चार संशयित आरोपी फरार आहेत. (four accused tried to set youth on fire on his birthday in beed district)

वाढदिवशीच धारूर घाटात जिवंत जाळण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा गायकवाड या तरुणाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे चार तरुण आले आणि त्याला धारुर घाटात घेऊन गेले. मात्र, वाढदिवस साजरा न करता गायकवाड या तरुणाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला वाढदिवशीच जिवंत जाळण्यात आले. यामध्ये कृष्णा गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

संशयित चारही आरोपी फारार, पोलिसांचा शोध सुरु 

हा प्रकार समोर येताच चार जणांविरोधात दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून तपासाला सुरुवात केली आहे. संशयित चार आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तर दुसरीकडे जखमी झालेल्या तरुणावर अंबाजोगाई येथे उपचार सुरु आहेत.

जिवंत जाळण्याचा प्रकार नेमका का ? कारण अस्पष्ट  

दरम्यान, वाढदिवशीच एक तरुणाला जिंवत जाळून त्याची हत्या करण्याचे धक्कादयक कृत्य केल्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तरुणांनी हे कृत्य नेमके का केले ? या कृत्यामागे सुडाची भावना होती का ? असे प्रश्न विचारले जात आहे. फरार संशयित आरोपींनी हा प्रकार का केला याचा अद्याप सोध लागला नसून पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

डोंबिवलीमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

तर दुसरीकडे अल्पवयीन मुलीवर बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.

इतर बातम्या :

पतीचा चारित्र्यावर संशय, संतापलेल्या पत्नीकडून 3 लाखांची सुपारी, नागपुरातील महिलेने नवऱ्याचा काटा काढला

हा तर बापाच्या नावाला कलंक!! पोटच्या मुलीची तीन वेळा विक्री, गर्भपात करून जबरदस्तीने लावले लग्न

पिंपरी-चिंचवडमध्ये भररस्त्यात युवकाची हत्या, आठ दिवसात शहरात खुनाची सातवी घटना

(four accused tried to set youth on fire on his birthday in beed district)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.