AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा तर बापाच्या नावाला कलंक!! पोटच्या मुलीची तीन वेळा विक्री, गर्भपात करून जबरदस्तीने लावले लग्न

औरंगाबाद: केवळ काही रुपयांच्या लोभापायी पोटच्या मुलीची विक्री (Father sold his daughter) करणाऱ्या बापाचं अत्यंत घृणास्पद कृत्य नुकतंच औरंगाबादेत उघड झालं. आपल्याच मुलीला या बापानं आधी दोन वेळा विकलं. त्यानंतर ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला. मुलीच्या अशा स्थितीनंतरही तिचं जबरदस्तीनं लग्न लावून देण्याचा संतापजनक प्रकार घडवला. औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC Police Station, Aurangabad) […]

हा तर बापाच्या नावाला कलंक!! पोटच्या मुलीची तीन वेळा विक्री, गर्भपात करून जबरदस्तीने लावले लग्न
बापानेच मुलीला तीन वेळा विकल्याचा घृणास्पद प्रकार औरंगाबादेत उघड झाला.
| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 3:39 PM
Share

औरंगाबाद: केवळ काही रुपयांच्या लोभापायी पोटच्या मुलीची विक्री (Father sold his daughter) करणाऱ्या बापाचं अत्यंत घृणास्पद कृत्य नुकतंच औरंगाबादेत उघड झालं. आपल्याच मुलीला या बापानं आधी दोन वेळा विकलं. त्यानंतर ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला. मुलीच्या अशा स्थितीनंतरही तिचं जबरदस्तीनं लग्न लावून देण्याचा संतापजनक प्रकार घडवला. औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC Police Station, Aurangabad) पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारामुळे असा बाप कोणालाही मिळू नये, अशीच भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणातील वडील, सावत्र आई आणि काकाला जेरबंद करण्यात आलं असून त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तीन वर्षांपूर्वी परराज्यात विक्री

तीन वर्षांपूर्वी वाळूज महानगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस तिचे वडील, सावत्र आई आणि काका यांनी इतर नातेवाईकांच्या मदतीने गुजरात राज्यात विकले. गुजरातमधील एका महिलेले 2 लाख रुपयांसाठी या मुलीची विक्री केली. तिथे पीडितेवर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारामुळे पीडिता आजारी पडली. त्यामुळे गुजरातमधून संबंधित महिलेने पीडितेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मुलीला त्यांच्या स्वाधीन केले. गुजरातमधून पुन्हा एकदा मुलीला वाळूजला पाठवण्यात आलं.

दुसऱ्यांदा नंदूरबारला पाठवले

गुजरातमधून अत्याचार झेलून आलेली मुलगी खूप आजारी होती. त्यानंतर दुसऱ्यांदा तिला नंदुरबारमधील एका व्यक्तीला विकले गेले. त्यानेही तिच्यावर दोन महिने अत्याचार केले. या वेळी पीडिता गर्भवती राहिली. ती सतत आजारी पडत असल्याने त्या व्यक्तीनेगी मुलीच्या आई-वडिलांशी संपर्क साधून त्यांना नंदूरबारला बोलावून घेतले. तेथे मुलीला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

तिसऱ्यांदा सातारा परिसरातील व्यक्तीशी लग्न

नंदूरबारहून या पीडितेला वाळूजमध्ये पुन्हा आणले गेले. गर्भवती असल्याने तिच्यावर विविध औषधांचे प्रयोग करून तिचा गर्भपात करण्यात आला. काही दिवसांनी मुलीच्या आई-वडिलांनी तिला सातारा येथील व्यक्तीकडून पैसे घेऊन त्याच्यासोबत तिचे बळजबरीने लग्न लावून दिले. तेथेही पतीकडून तिला लैंगिक अत्याचार सहन करावे लागले.

मुलीने 7 जणांविरुद्ध तक्रार नोंदवली

लग्न करून या मुलीला नांदेडमधील हदगाव येथे नेण्यात आले. तेथेही पती आणि सासूकडून छळ होत असल्याने पीडितेने मावशीच्या मोबाइलवर संपर्क करून मला घेऊन जा, अन्यथा आत्महत्या करीन अशी धमकी दिली. त्यामुळे नातेवाईकांनी तिला पुन्हा घरी नेले. दरम्यान आई-वडील व नातेवाईकांनी पैशांसाठी तीन वेळा विक्री केल्याची तक्रार मुलीने नांदेडमधील हदगाव पोलीस ठाण्यात केली. तेथे 7 जणांविरुद्ध तक्रार दिली. ही घटना वाळूज एमआयडीसी हद्दीत घडल्याने हदगाव पोलिसांनी हा गुन्हा वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला.

बाप, सावत्र आई व काकाला अटक

दरम्यान, या प्रकरणातील वडील, सावत्र आई आणि काका या तिघांना हदगाव पोलिसांनी अटक केली. वाळूज एमआयडीसीतील पोलीसांच्या पथकाने या तिघांना ताब्यात घेतले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक एम.आर. घुनावत हे करीत आहेत.

इतर बातम्या- 

भाजीमंडईत थरार घडवणारा टिप्या पोलिसांच्या तावडीतून पुन्हा निसटला, नाशिकमधल्या नातेवाईकांच्या घरावर पोलिसांचा छापा

Aurangabad Crime: खिशात मोबाइल, काखेत ट्रान्समीटर, कानात मख्खी एअरफोन, औरंगाबादेत पोलिस चालक परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचे उघड

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.